तरुण भारत

वाघांची नखे गायब प्रकरणाची चौकशी

वाळपई प्रतिनिधी ?

 सत्तरी तालुक्मयातील गोळावली गावांमधील धनगरवाडा याठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाल्यानंतर आता म्हादई अभयारण्याचे व्यवस्थापन वनखाते व केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने नियुक्त केलेल्या पथकाच्या माध्यमातून वेगवेगळय़ा स्तरावरील चौकशीला गती निर्माण झाली आहे. एका वाघाची नखे गायब झालेल्या प्रकरणाचा वेगवेगळय़ा पद्धतीच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न संबंधित पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सध्यातरी या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत या नखांचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 सध्यातरी वाघाच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात युद्धपातळीवर तपास जारी करण्यात आला असून तपास अधिकारी यंत्रणेच्या माध्यमातून अनेक संशयितांची नावे त्यांच्यासमोर आहेत. या संदर्भात सध्यातरी वेगवेगळय़ा माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. गरज पडल्यास ज्या संशयितांची नावे त्यांच्याकडे आहेत त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, अशा प्रकारची माहिती अधिकारी सूत्राकडून उपलब्ध झालेली आहे. वाघ हा राष्ट्रीय प्राणी असून त्याच्या मृत्यूचे प्रकरण म्हणजे सध्यातरी गोवा सरकारची मोठय़ा प्रमाणात नाचक्की झालेली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालया समोर मोठय़ा प्रमाणात दबाव निर्माण झाला असून जागतिक स्तरावर प्रचंड प्रमाणात कमी होणारी वाघांची संख्या व गोळवली गावांमध्ये विषाचा प्रयोग करून वाघांचा झालेला मृत्यू त्याच्या पार्श्वभूमीवर सरकार समोरही मोठय़ा प्रमाणात दबाव निर्माण झाला आहे.

पावणे कुटुंबियाचा सुरक्षतेचा प्रश्न

 ज्या पद्धतीने संशयितांना अटक करण्यात आलेली आहे ती पद्धत मानवअधिकाराच्या विरोधात असून जबरदस्तीने अटक करून व कुटुंबियांची दिशाभूल करून त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नामुळे पावणे कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सध्यातरी या कुटुंबासमवेत घरांमध्ये एकही पुरुष करता नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गोवा धनगर समाज संघटनांनी आज संध्याकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सदर कुटुंबियाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला असून सरकारने या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे तपास यंत्रणेच्या माध्यमातून काही अधिकारी सदर कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे खेद व्यक्त केला आहे.

वनखाते यंत्रणा दहशत दाखवत असल्याचा आरोप

शुक्रवारी संध्याकाळी भिरो पावणे यांना चुकीच्या पद्धतीने चौकशीसाठी बोलावून शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भाची माहिती देण्यासाठी अभयारण्याचे काही कर्मचारी पावणे कुटुंबीयांकडे गेले होते. एका कागदावर जबरदस्तीने सह्या घेण्याचा प्रयत्न सदर कर्मचाऱयाकडून झाला. त्यामुळे सदर कुटुंबियांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली व सदर कागदावर सही करण्यास नकार दिला. यामुळे संतप्त बनलेल्या संबंधित कर्मचाऱयांनी सदर कागदावर सह्या न केल्यास सर्व कुटुंबाला कोठडीत टाकणार असल्याचा धमकी दिल्यामुळे या कुटुंबियांना तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची दहशत दाखवून या प्रकरणात आमच्या पाच पुरुषांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

 कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार तपास यंत्रणेला असतो मात्र दहशतीचे वातावरण निर्माण करून चौकशी करण्याचा प्रयत्न म्हणजे मानवधिकारा विरोधात असून यासंदर्भात गरज पडल्यास मानव अधिकाऱयांसमोर तक्रार करणार असल्याचे या कुटुंबियानी सांगितले.

अनेक कर्मचारी रडारवर

दरम्यान वाघाच्या मृत्यूचे प्रकरण सध्यातरी जागतिक स्तरावर प्रचंड प्रमाणात गाजत आहे. 20 डिसेंबर रोजी पावणे कुटुंबीयांच्या एका गाईवर हल्ला करून ठार मारण्यात आले होते. या संदर्भाची माहिती सदर कुटुंबियाकडून म्हादई अभयारण्याच्या यंत्रणेला देण्यात आली होती. तरीसुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर 30 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा म्हशीवर हल्ला करून त्याला ठार मारण्यात आले. यात दोन्ही प्रकरणांमध्ये गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे शेवटी विषाचा प्रयोग करून वाघांना मारण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या हलगर्जीपणा विरोधात सध्यातरी वनखात्यात वरि÷ अधिकारी मंडळी समोर प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत असून या संदर्भाची खात्यांतर्गत चौकशी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसे झाल्यास अनेक अधिकारी व संबंधित अभयारण्य क्षेत्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्मयता आहे.

Related Stories

वाळपई बनली पोलिसांची छावणी

Patil_p

आदर्श कृषी संस्थेने काल पहिल्याच दिवशी खरेदी केल्या 140 टन काजू

Omkar B

कोरोना पोचला उपजिल्हा इस्पितळातील चाचणी केंद्रात

Omkar B

शिरोडय़ात कोविड केअर सेंटरला विरोध पोलिसांचा ग्रामस्थावर लाठीचार्ज दहाजणांना अटक

Omkar B

नेसाय येथे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला तीव्र विरोध

Omkar B

पणजीत सुमारे 1 लाखाचा गुटखा जप्त

Omkar B
error: Content is protected !!