तरुण भारत

फिटनेस मंत्रा

जीवनशैलीत काही विशिष्ट बदल करून आणि नियमित काही गोष्टी कटाक्षाने करून तुम्ही कसे निरोगी आणि फिट राहू शकता, हे पाहता खालील गोष्टी आजमावून पाहा…

1.सकाळी लवकर उठा

Advertisements

“लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्यसंपदा लाभे’’ असं म्हटलं जातं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. मात्र आजकालची जीवनशैली पूर्वीप्रमाणे नाही. त्यामुळे अनेक लोक रात्री उशिरा झोपतात. त्यामुळे सकाळी लवकर उठण्यासाठी त्रास होतो. यासाठी शक्मय असल्यास रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. मात्र रात्री उशिरा झोपण्याची इतकी सवय लागलेली असते की प्रयत्न करूनही रात्री लवकर झोप येत नाही. यासाठी काही उपाय जरूर करा. अगदी पहाटे नाही पण कमीतकमी सकाळी सहा अथवा सातच्या आधी उठण्यासाठी तुम्हाला रात्री कमीतकमी साडे- दहा ते अकरा वाजेपर्यंत झोपावे लागेल. यासाठी रात्री उशिरापर्यंत टीव्ही,मोबाईल पाहणे बंद करा. झोपण्याआधी अर्धा तास गॅझेट्स बंद करण्याचा प्रयत्न करा. उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करणे अथवा पुस्तक वाचणे टाळा.

  1. नियमित व्यायाम करा

फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्यासाठी सवय लावावी लागेल. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि प्रेश होतं. दिवसभरात कितीही कामाचा व्याप असला तरी कमीतकमी पंधरा ते वीस मिनिटे स्वतःच्या निरोगी जीवनासाठी काढणे मुळीच कठीण नाही. यासाठी सकाळी लवकर उठा आणि वीस ते तीस मिनिटे व्यायाम करा. फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम हा करायलाच हवा. दिवसभरातून तीस मिनिटे रोज व्यायामासाठी देणं फार अवघड नक्कीच नाही. निरोगी जीवनशैलीसाठी चालणे, जॉगिंग, कार्डियाक एक्सरसाईज असे व्यायाम करणे फार गरजेचे आहे.

3.योगासने आणि प्राणायाम

योगासने आणि प्राणायामदेखील फार महत्त्वाचे आहेत. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि प्राणायामामुळे तुमच्या श्वासावरील नियंत्रण वाढते. योगासने आणि प्राणायामामुळे तुमच्या शरीराला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यामुळे तुम्ही दिवसभर प्रेश राहता.

4.ध्यानधारणा

ध्यानधारणा आणि प्रार्थना याचा जीवनावर नेहमीच सुपरिणाम होत असतो. यासाठी दैनंदिन जीवनात सकाळी अथवा संध्याकाळी काही मिनिटे ध्यानधारणेसाठी अवश्य काढा. ध्यानधारणेचा संबंध थेट तुमच्या मनासोबत जोडला जातो. मन हे एवढं शक्तीशाली आहे की ते तुम्हाला जीवनातील सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त करून देऊ शकतं. मनातील विचारांचा तुमच्या आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो. शिवाय सकाळी मेडीटेशनमुळे तुमच्या दिवसाची सुरूवात प्रेश आणि सकारात्मक होते. 

 5.सकारात्मक विचार

विचार आपल्या जीवनावर परिणाम करीत असतात. सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही नेहमी प्रेश राहू शकता. सकारात्मक विचारांचा तुमच्या शरीराप्रमाणेच संपूर्ण व्यक्तिमत्वावरच चांगला परिणाम होतो. सकारात्मक विचार करणारे लोक नेहमी सर्वांना आवडतात. शिवाय सकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टीच घडतात.

  1. संतुलित आहार

संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे. सतत जंक फूड आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे तुमचे आरोग्य धोक्मयात येऊ शकते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा यांचा  आहारात समावेश करा. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. सकाळचा नाश्ता करण्यास कधीच टाळाटाळ करू नका.

  1. आत्मविश्वास वाढवा

फिट राहण्यासाठी आत्मविश्वास असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. आत्मविश्वास कमी असल्यामुळे जर तुम्ही सतत निराश आणि उदासीन असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. आत्मविश्वासाने जगल्यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते.

8.मद्यपान आणि धूम्रपान टाळा

आयुष्यात कोणतीही परिस्थिती असेल तरी व्यसनांच्या आहारी मुळीच जाऊ नका. धूम्रपान आणि मद्यपानाचे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. यासाठी जाणीवपूर्वक व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

9.भरपूर पाणी प्या

निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमचं शरीर हायडेट राहतं. निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते.  कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला देखील भोगावे लागतात. एका संशोधनानुसार, तुमच्या शरीराला पुरेसा पाण्याचा पुरवठा झाल्यावरच तुमच्या त्वचेसाठी लागणाऱया पाण्याचा पुरवठा त्वचेला केला जातो. यासाठी सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी
पुरेसं पाणी प्या.

 

Related Stories

क्रोध हा खेदकारी

Patil_p

छंदातून जनजागृती

Patil_p

मैत्र जीवांचे

Patil_p

शोध माणुसकीचा

Patil_p

हवी फक्त इच्छाशक्ती

tarunbharat

राष्ट्रीय नारा ‘जय हिन्द’

Patil_p
error: Content is protected !!