तरुण भारत

अन्नोत्सवात खवय्यांची गर्दी

बेळगाव / प्रतिनिधी :

चटकदार पदार्थांबरोबरच मालवणी, कोल्हापुरी, खानदेशी, पंजाबी, साऊथ इंडियन, बंगाली, राजस्थानी या खाद्यपदार्थांची एकत्रित चव चाखण्याकरिता रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित रोटरी अन्नोत्सवाला रविवारी गर्दी झाली होती. बेळगाव बरोबरच परिसरातील खवय्यांनी खमंग अशा खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

Advertisements

रोटरी क्लबच्यावतीने सीपीएड मैदानावर अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील खाद्य संस्कृतीचे दर्शन या अन्नोत्सवाच्या माध्यमातून बेळगावच्या नागरिकांना घडविले जात आहे. शाकाहारी पदार्थांबरोबरच चटकदार मांसाहारी पदार्थ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे अन्नोत्सव पाहण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळली होती.

खाद्य पदार्थांबरोबर विविध मनोरंजनाची साधणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. जायंट व्हील बरोबरच लहान मुलांकरिता इतर क्रीडा प्रकार या ठिकाणी मांडण्यात आल्यामुळे बालचमुंची गर्दी होत आहे. रविवारी विविध संगीत कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संगीत मैफलीबरोबर खवय्यांनी खाण्याचा आनंद लुटला.

अन्नोत्सवामध्ये गृहोपयोगी साहित्य, बँकिंग, दुचाकी व चारचाकी वाहने, वस्त्र प्रावरणे, फोटो फ्रेम, फर्निचर साहित्य यासह विविध उपकरणे मांडण्यात आली आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांबरोबरच या साहित्य खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी होत आहे.

 

 

 

Related Stories

आंबेवाडीतील श्री दत्त जयंती उत्सव होणार साधेपणाने

Omkar B

समाज कल्याण कार्यालयाचे 22 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 32 जणांना कोरोनाची बाधा

Patil_p

एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नुतनीकरण

Amit Kulkarni

निशिकांतच्या मोबाईलमधून मेसेज कोणी केला?

Patil_p

मासिक बसपासधारकांची संख्या घटतीच

Patil_p
error: Content is protected !!