तरुण भारत

परवेझ मुशर्रफ यांची फाशी रद्द

ऑनलाइन टीम / लाहोर : 

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचे सांगत ती रद्द करण्यात आली आहे. जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोह असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली होती.

Advertisements

या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोरच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. ज्यानंतर लाहोर हायकोर्टाने आज ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱया विशेष न्यायालयालाच असंवैधनिक म्हटले आहे. त्यामुळे, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, 17 डिसेंबरला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना देशद्रोही ठरवलं. त्यानंतर पाकिस्तानी घटनेनुसार अनुच्छेद सहा अन्वये फाशीची शिक्षा सुनावली होती.

 

Related Stories

इस्रायल-हमासचा संघर्ष, 72 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

अयोध्येत मशीदीसाठी जागा निश्चित केलेली नाही : अवनीश अवस्थी

prashant_c

हिंगणघाट घटना : नवनीत राणांनी लोकसभेत उपस्थित केला मुद्दा

prashant_c

मॉडर्नाच्या 10 कोटी अतिरिक्त डोसची मागणी

Patil_p

फ्रान्समध्ये पुन्हा देशव्यापी कर्फ्यू

datta jadhav

इराणमध्ये कोरोनाची तिसरी लाट; 32 प्रांत रेड झोनमध्ये

datta jadhav
error: Content is protected !!