तरुण भारत

विंडीज संघात ड्वेन ब्रॅव्होचे पुनरागमन

वृत्तसंस्था / सेंट जॉर्जेस :

15 जानेवारीपासून खेळविल्या जाणाऱया आयर्लंड विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा करण्यात आली. 36 वर्षीय अष्टपैलू ड्वेन ब्रॅव्होचे तब्बल तीन वर्षांनंतर विंडीज संघात पुनरागमन होत आहे.

Advertisements

या मालिकेसाठी रविवारी 13 जणांचा विंडीज संघ जाहीर करण्यात आला. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून विंडीजच्या निवड समितीने ड्वेन ब्रॅव्होचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. ब्रॅव्होने यापूर्वी विंडीज संघाला आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. 2016 च्या सप्टेंबरमध्ये ब्रॅव्होने आपला शेवटचा टी-20 सामना पाकविरूद्ध खेळला होता. ब्रॅव्होने विंडीजकडून 66 टी-20 सामन्यात फलंदाजीत 1142 धावा तर गोलंदाजीत 52 गडी बाद केले आहेत. 2010 साली ब्रॅव्होने आपली शेवटची म्हणजे 40 वी कसोटी खेळली होती.

विंडीज संघ- किरॉन पोलार्ड (कर्णधार), ड्वेन ब्रॅव्हो, कॉट्रेल, हेटमेयर, किग, लेविस, पिरे, पुरन, आर. पॉवेल, रूदरफोर्ड, सिमॉन्स, वॉल्श आणि के. विलीयम्स.

विंडीज आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 15 जानेवारीला ग्रेनेडात, दुसरा टी-20 सामना 18 जानेवारी सेंट किटस्, तिसरा टी-20 सामना 19 जानेवारीला सेंट किटस् येथे होणार आहे.

 

Related Stories

ऑस्ट्रेलियात जोकोविच आठव्यांदा अजिंक्य

Patil_p

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंकडून कोव्हिड योद्धय़ांचा गौरव

Patil_p

चिंकी यादव, राही सरनोबद, मनू भाकर यांचा सुवर्णवेध

Amit Kulkarni

पाकच्या अलीम दार यांचा पंचगिरीत नवा विक्रम

Patil_p

क्लब क्रिकेटपटू संजय डोबाल यांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

‘यॉर्कर’ने अठराविश्वे दारिद्रय़ाची शकले पाडणारा टी. नटराजन

Omkar B
error: Content is protected !!