तरुण भारत

काँग्रेसच्या हातात भाजपचे कमळ ?

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत काँग्रेसमधील दोन आणि एक अपक्ष  सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे त्या सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते ऍड. संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. अचानक त्यांनी ही तक्रार मागे घेतल्यामुळे काँग्रेसच्या हातात कमळ फुलणार की काय, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याशिवाय काँग्रेसचे सर्व सदस्य मंगळवारी होणाऱया सभापती निवडीत भाजपला मतदान करतील, असा अंदाजही बांधला जात आहे.

Advertisements

  झेडपी निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत भाजपला मतदान केल्यामुळे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शिलवंत भासगी आणि अपक्ष सदस्य शिवानंद पाटील यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी गटनेते ऍड. गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. परंतु भाजप पुरस्कृत समविचारी नेत्यांनी या तीन सदस्यांवरील कारवाई मागे घ्यावी, तसेच काँग्रेसच्या राहिलेल्या  सर्व सदस्यांनी भाजपसोबत आल्यास काँग्रेसमधील एका सदस्याला विषय समिती सभापती देऊ, असे आश्वासन दिल्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्यांनी ही तक्रार मागे घेतली आहे. अशी चर्चा आहे.

माळशिरस तालुक्यातील सहा सदस्यांमुळे राष्ट्रवादीला झेडपीत सत्ता स्थापना करता आली नाही. मंगळवारी विषय समिती सभापतींची निवड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या सहा सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द व्हावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजप पुरस्कृत समविचारी नेत्यांसोबत राष्ट्रवादीचे सहा सदस्य गेल्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला होता. तो झटका विषय समिती सभापती निवडीवेळी होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.

त्या सहा सदस्यांची आज सुनावणी

माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले (मोहिते-पाटील गटाचे) स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (बोरगाव गट), मंगल किरण वाघमोडे (संग्रामनगर गट), शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील (अकलूज गट), सुनंदा बाळासाहेब फुले (यशवंतगर गट), अरुण बबन तोडकर (म्हाळुंग गट), गणेश महादेव पाटील (पिलीव गट) या सहा सदस्यांनी पक्षविरोधी मतदान केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. या सदस्यांनी आपले म्हणणे जिल्हाधिकाऱयांसमोर मांडले असून, त्याची सुनावणी मंगळवारी दुपारी एक वाजता होणार आहे.

Related Stories

सोलापूर : बार्शी रोडवर वाहने झाली पलटी, प्रवाशी बेजार

Abhijeet Shinde

आरक्षण स्थगिती हटे पर्यंत लढा सुरूच राहणार – छत्रपती संभाजीराजे

Abhijeet Shinde

सोलापूर : महिंसगाव येथे चोरट्याने केला ६२ हजारांचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के, शिक्षक मतदारसंघसाठी 85.09 टक्के मतदान

Abhijeet Shinde

दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईकासह दोघांना अटक

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडले 3 कोटींचे सोने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!