तरुण भारत

गोकुळ संघाच्या दूध दरात वाढ

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने गाय, म्हैशीच्या दूध दरात वाढ केली आहेसंघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय व म्‍हैस दुध खरेदी दरामध्‍ये 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आले आहे.

Advertisements

गाय दुध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे गाय दुध दर २७ रूपये वरून आता २९ रूपये इतका होणार आहे. तसेच म्‍हैस दुध खरेदी दरामध्‍ये ७.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता एक रूपये सत्‍तर पैसे इतकी वाढ करणेत आली आहे. त्यामुळे म्‍हैस दूध खरेदी दर ४२. ३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे.

Related Stories

ऐन दिवाळीत एकुलत्या मुलाचा मृत्यू; खटाववर शोककळा

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत वाढ, कोरोनामुक्तांत घट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रेशनवर मिळणार एक महिन्यासाठी मका

Abhijeet Shinde

कोरोना : चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी विमानाने दिल्लीत दाखल

prashant_c

कागल येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० मेंढरांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळ दूध दरवाढीचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!