तरुण भारत

ब्रिटनची सम्राज्ञी-राजपुत्राची भेट

लंडन

 ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्वतःचा नातू राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी काही कालावधी देण्यास सोमवारी हमी दर्शविली आहे. या कालावधीत हॅरी आणि मेगन ब्रिटन आणि कॅनडात वास्तव्य करणार आहेत. या मुद्दय़ावर चर्चा पार पडल्यावर बंकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराणींनी हॅरी यांची भेट घेत चर्चा केली आहे.

Advertisements

राजघराण्याच्या दोन्ही सदस्यांच्या भविष्यातील भूमिकेसंबंधी पुढील काळात निर्णय घेतला जाणार आहे. महाराणींनी या मुद्दय़ावर हॅरी यांची भेट घेत दांपत्याच्या भविष्यातील भूमिकेसंबंधी चर्चा केली आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या जबाबदारींचा त्याग करण्याची इच्छा असल्याचे हॅरी आणि मेगन यांनी अलिकडेच जाहीर केले होते. हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्याचा त्याग करत बहुतांश काळ अमेरिकेत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे. राजघराण्याचे पद सोडण्यासारख्या मोठय़ा पावलामुळे मेगन यांचा ‘वर्ण’ कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

Related Stories

या ‘तुरुंगा’त मिळते मद्य

Patil_p

स्पेनमध्ये थंडीने मोडला मागील 70 वर्षांचा विक्रम

Patil_p

इराणचे अणुबॉम्बचे स्वप्न ‘मोसाद’मुळे फुस्स

Patil_p

इंग्लंडमध्ये फैलावतोय कोरोनाचा नवा प्रकार

Patil_p

चीनच्या चिथावणीमुळेच नेपाळचा नवा नकाशा

Patil_p

90 वर्षीय ताकिशिमा आहेत फिटनेस इंस्ट्रक्टर

Patil_p
error: Content is protected !!