तरुण भारत

युक्रेन विमानाप्रकरणी पहिली कारवाई

आंतरराष्ट्रीय दबावामुळे इराणने उचलली पावले

वृत्तसंस्था/  तेहरान

Advertisements

युक्रेन एअरलाईन्सच्या विमानाला चुकून पाडविल्यावर सातत्याने निदर्शनांना तोंड देणाऱया इराणने याप्रकरणी पहिली कारवाई केली आहे. इराणने एका अधिकाऱयाला अटक केल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान मागील बुधवारी उड्डाणानंतर त्वरित क्षेपणास्त्राद्वारे पाडविण्यात आले होते. विमानातून प्रवास करणाऱया सर्व 176 जणांचा यात मृत्यू झाला होता.

बोइंग 737 विमान कोसळण्यामागे आपला हात नसल्याचा दावा इराणने प्रारंभी केला होता. पण जागतिक स्तरावरून दबाव वाढल्याने इराणने युक्रेनचे विमान चुकून पाडविल्याची कबुली दिली होती. मानवी चुकीमुळे विमान कोसळल्याचा दावा इराणने केला होता.

इराणच्या जनरलने मानली चूक

रिव्हॉल्युशनरी गार्ड्स एअरोस्पेसचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अमीरली हाजीजादेह यांनी विमानाला क्रूज क्षेपणास्त्र समजून ते पाडविण्यात आल्याची कबुली दिली आहे. युक्रेन विमान कोसळल्याप्रकरणी काही जणांना अटक झाल्याचे एका पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. पण किती जणांवर कारवाई झाली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दोषींना शिक्षा होणार

या घटनेसाठी जबाबदार प्रत्येक व्यक्तीला शिक्षा होणे गरजेचे आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार लोकांना कायद्याला सामोरे जावे लागणे आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार राष्ट्रपती हसन रुहानी यांनी काढले आहेत. न्यायपालिकेने एका विशेष न्यायालयाची स्थापना करून त्यात वरिष्ठ शेणीचे न्यायाधीश आणि तज्ञांचा समावेश करावा. या घटनेसाठी केवळ एक व्यक्ती जबाबदार असू शकत नसल्याचे ते म्हणाले.

Related Stories

नेपाळमध्ये नदीत कोसळली बस, 28 ठार

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखांचा टप्पा

datta jadhav

अमेरिकेत विक्रमी प्री-पोल मतदान

Patil_p

अमेरिकेत पुढील महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात

datta jadhav

चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ चाकूहल्ला; चार जखमी

datta jadhav

संयुक्त सागरी गस्तीचा श्रीलंकेकडून प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!