तरुण भारत

वैज्ञानिक होण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज : पोळ

पेठवडगाव/प्रतिनिधी :

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून देशासाठी निश्चितच वैज्ञानिक तयार होतील. स्पर्धेच्या युगात बाल वैज्ञानिकांनी विज्ञानाची कास धरल्यास संशोधक होण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल, यासाठी जिद्द, आत्मविश्वास असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.

Advertisements

बळवंतराव यादव विद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी किरण लोहार म्हणाले,” इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामधून अठरा उपकरणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. यामुळे कोल्हापूर विभागाचे नाव निश्चितच उंचावले आहे. या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून १७५ विद्यार्थी सहभागी होते. यामधून कोल्हापूर जिल्ह्यातून १३, सिंधुदुर्गमधून २ व रत्नागिरी जिल्ह्यातून तीन अशी १८ उपकरणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडली आली आहेत.

यावेळी या कार्यक्रमास गुजरात विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. आर. के. पाटील, शिक्षणाधिकारी किरण लोहार, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, उपसभापती राजकुमार भोसले, राजनशेटे, बी.जी. बोराडे, कार्यवाह अभिजीत गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी व्ही. डी. टोणपे, एस. एम. मानकर, नगरसेविका अनिता चव्हाण, संगीता मिरजकर, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, अंजली शिंदे,मुख्याध्यापिका आनंदी माने, पर्यवेक्षक मनीषा पोळ, पी.बी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत भोरे व स्वस्तिक माळी यांनी केले. आभार उपप्राचार्य किरण कोळी यांनी मानले.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व शाळेचे नाव

कोल्हापूर जिल्हासानिया नदाफ (आनंदीबाई पाटील इंग्लिश स्कूल), पृथ्वीराज यादव( पाटील हायस्कूल,कौलव), प्रज्वल फडके (पाटील हायस्कूल, आवळी खुर्द),सुमित मोहिते (चावरे माध्यमिक विद्यालय, चावरे) ,प्रतीक्षा कांबळे सौम्या मुरगी ( गडहिंग्लज हायस्कूल), श्रुती कमलाकर( राजमाने विद्यालय, रूई), यशवर्धन चरापले (बी.के. पाटील हायस्कूल, कौलव), सिद्धी बरगे( पद्माराजे, शिरोळ), आदित्य वागवेकर( बालिंगे हायस्कूल), श्रावणी अस्वले (केदारी रेडेकर स्कूल, गडहिंग्लज), गौरी सावंत (शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज), समृद्धी वागरे (गर्ल्स स्कूल, कोल्हापूर),रत्नागिरी जिल्हासुरज गवरे( अर्जुना विद्या मंदिर, कारवली), तन्वी गुरव (जि. . प्राथमिक शाळा, कुवे नंबर १), वेदांत शिवणकर( न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे),सिंधुदुर्ग जिल्हाअमोली धुरी( प्रगत विद्यामंदिर, रामगड), जय भाट( विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली)

Related Stories

प्रवासी घटल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

Abhijeet Shinde

कोल्हापुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७६७ जणांवर गुन्हे, १ लाख ५३ हजाराचा दंड वसूल

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापलिकेची वर्षाखेरीस निवडणूक ?

Abhijeet Shinde

अमेरिकास्थित भारतीय अभियंत्याची शिवाजी विद्यापीठ कोविड सेंटरला मदत

Abhijeet Shinde

शेंडा पार्क येथील हजारो झाडांना पुन्हा आगीचा धोका ? प्रशासनाचे ही दुर्लक्ष

Sumit Tambekar

इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!