तरुण भारत

करिअर, बुध्दिमत्तेचे पैलू

डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 साली हॉर्वर्ड विश्वविद्यालयात बहुविधा किंवा बहुआयामी बुध्दीमत्तेचा सिध्दात मांडला. यासाठी त्यांना ‘नोबेल प्राईज’ने सन्मानीत करण्यात आले.

डॉ. गार्डनर म्हणतात, बुद्धिमत्ता एक नाही तर अनेक प्रकारच्या असतात.बुद्धिमत्ता या शब्दाला अनेक आयाम आहेत. प्रत्येक व्यक्तींच्या मेंदूची संरचना वेगवेगळी असते. ‘व्यक्ती तितक्मया प्रकृती’ तसेच व्यक्ती तितक्मया मेंदूच्या संरचना!

Advertisements

गार्डनर यांनी 10 प्रकारच्या गाभातून बुद्धिमत्ता असल्याचे संख्याशास्त्रीय पद्धतीने दाखवून दिले. प्रत्येक व्यक्तीला यापैकी एखाद्या तरी प्रकारात दर्जेदार प्रावीण्य मिळविण्याची संभाव्यता असते आणि एकातरी मनचौकटीचे प्रचंड सुप्त सामर्थ्य असते.

या नव्या संशोधनामुळे व्यक्तीला स्वयंसुधार किंवा स्वयंविकास करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहेत. शाळेत लेखी परिक्षांनी बुद्धिमत्ता मोजली जाते. त्यात प्रावीण्य न दाखविल्यामुळे जे विद्यार्थी व त्यांचे पालक नाऊमेद-निराशा होतात. अशांसाठी तर ही नवी आशा, नवा दिलासा देणारी प्रकाशवाट असेल. जागतिक चषक फुटबॉल स्पर्धेत भाग घेणाऱया बहुसंख्य खेळाडूंचा बुद्धय़ांक सामान्यांपेक्षा कमी असल्याचे मोक्सिकोम आढळले होते. पण ते फुटबॉल खेळात प्रवीण आणि बुध्दीमान होतेच ना!

बुद्धिमत्तेबद्दल गैरसमज

बुद्धिमत्तेबद्दल अनेक गैरसमज समाजमनात आहेत. जे मूल अभ्यासात हुशार, परीक्षेत चांगले गुण मिळवते ते बुद्धिमान असं आपण म्हणतो. बुद्धिमत्ता म्हणजे स्मरणशक्ती, आकलनशक्ती गणित पटापट सोडविता येणं, लेखन वाचनक्षमता, प्रश्नाची  उत्तर चटाचट सांगता येण इ. शालेय अभ्यासातील प्रगती. बुद्धी ही एकजीनसी असून साकल्यानं कार्य करते. एकाच प्रकारची असून फक्त बुध्दीमत्तेच प्रमाण व्यक्तिगणीक कमी जास्त असते. या गैरसमजाला गार्डनर यांच्या सिध्दांतान हादरा दिला. आणि मानसशास्त्रात क्रांती केली. प्रत्येक व्यक्ती जन्मतःच काही एक दोन प्रबळ बुध्दीमत्ता घेऊन जन्माला येते. निसर्गदत्त बुध्दिमत्ता जोपासली की आपोआपच तुम्ही करिअरमध्ये उंच उंच जाता. या बुद्धिमत्तांच्या विरोधात काही करायला सांगितलं की त्या व्यक्तीवर बौद्धिक ताण येतो.

गार्डनर यांच्या मते फक्त सुप्रसिध्द यशस्वी व्यक्तीच नव्हें तर प्रत्येक सामान्य माणूस बुद्धीच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारात तरी अपेक्षेपेक्षा अधिक काहीतरी करुन दाखवू शकेल.

बुध्दीमत्तेचे बहुविध प्रकार

भाषाविषयक बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र किंवा गणितविषयक बुद्धिमत्ता, व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती संदर्भातील बुद्धिमत्ता, संगीतविषयकबुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता, अस्तित्ववादी बुद्धिमत्ता, आध्यात्मिक बुद्धिमत्ता.                                                               

– डॉ. रमा मराठे

Related Stories

फळबाजाराला बहर….

Patil_p

सर्दी खोकल्यावर उपाय

Patil_p

यालाच मनोरंजन असे नाव

Patil_p

आत्मविश्वास

tarunbharat

आगळी शिक्षणसेवा

Patil_p

व्यायाम उन्हाळय़ातील

tarunbharat
error: Content is protected !!