तरुण भारत

आक्रमण चीनला महागात पडणार!

तैवानच्या अध्यक्षांचा इशारा : खोटय़ा धारणांमधून चीनने बाहेर पडावे : डॅगनचा जळफळाट

तैपैई

Advertisements

 तैवान हा देश म्हणून पूर्वीपासूनच स्वतंत्र असल्याचे म्हणत अध्यक्षा त्साई इंग वेन यांनी चीनला आव्हान दिले आहे. चीनने तैवानसंबंधी स्वतःच्या भूमिकेवर नव्याने विचार करावा. चीनला कुठलेही आक्रमण चांगलेच महागात पडणार असल्याचा इशारा वेन यांनी दिला आहे. तैवान हा आपला अविभाज्य भाग असल्याचा दावा चीन करत आला आहे.

चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी फुटिरवाद्यांनी 10 हजार वर्षांपर्यंत कारवाया सुरूच ठेवल्या तरीही कुठलाच फरक पडणार नसल्याचे विधान तैवानसंबंधी केले होते. तैवानमध्ये अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षा त्साई इंग वेन यांना जनतेने प्रचंड बहुमतासह पुन्हा सत्तेची सूत्रे सोपविली आहे. त्साई यांना पराभूत करण्याचा चीनचा प्रत्येक डाव अपयशी ठरला आहे. चीनच्या धमक्यांसमोर तैवान झुकणार नसल्याचे उद्गार त्साई यांनी काढले आहेत.

तैवान स्वतंत्र राष्ट्र असून त्याचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना आहे. चीनने स्वतःच्या खोटय़ा धारणांमधून बाहेर पडावे असे तैवानने सुनावले आहे.

आधुनिक तैवान मागील 70 वर्षांपासून यशस्वी वाटचाल करत आहे. 1980 च्या दशकापासून तैवान आशियातील सर्वात विकसनशील लोकशाहींपैकी एक ठरला आहे. तैवानची स्वतंत्र ओळख असल्याचे त्साई यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

Related Stories

ColdZyme 20 मिनिटांत करणार 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट

datta jadhav

प्लाझ्मा थेरपी कोरोनावरचा उपचार नाही,आवरा;केंद्राचा इशारा

Rohan_P

पुढील 6 महिने निर्णायक

Patil_p

एका व्यक्तीला जोडले दोन्ही हात

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 28 लाखांचा टप्पा

datta jadhav

मेलबर्नमधील दुकाने 6 आठवडय़ांसाठी बंद

Patil_p
error: Content is protected !!