तरुण भारत

मोटारसायकल झाडावर आदळून दोघांचा मृत्यू

वार्ताहर/मणेराजुरी

मणेराजुरी-सावर्डे रस्त्यावर मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री फुटका घाण्याजवळील अपघाती वळणावर झाला. अपघातस्थळाच्या आसपास वस्ती नसल्यामुळे बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये प्रविण उर्फ अप्पू तमण्णा भिसे (वय 35) रा. मुरुंगडी ता. अथणी व सुरेखा काशीनाथ  नाईक (वय -27) रा. लिंगनूर ता. मिरज असे दोघे ठार झाले.

Advertisements

याबाबत घटनास्थळ व तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रविण उर्फ अप्पू तमण्णा भिसे हा सावर्डे फुटका घाण्याजवळील पोपट माळी यांच्या द्राक्षबागेत शेतमजूर म्हणून पंधरा दिवसापासून कामाला होता. मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यत बागेत फवारणी करून तो त्याच्या खोलीवर परतला होता. पण रात्री उशिरा त्याने मालकाची शाईन मोटारसायकल घेवून मालगाव ता. मिरज गेला व येथून सुरेखा काशीनाथ नाईक या महिलेला घेवून रात्री उशिरा सावर्डे येथे परतत असताना फुटक्या घाण्याजवळील वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव मोटारसायकल थेट लिंबाच्या झाडावर आदळली.

यामध्ये मोटारसायकलवरील दोघे उडून पडले तर मोटारसायकलचे पार्ट सगळीकडे विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱया वस्तीवरील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. रात्री उशिरा घटना घडल्यामुळे त्यांना मदत न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून येत होते. मयत प्रविण यास दोन मुले, पत्नी असून ते सर्व अथणी येथे मजुरी करतात. सुरेखा हिस चार अपत्ये आहेत. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनास्थळी सावर्डे पोलीस पाटील सुरेश खराडे-पाटील व पंचायत समिती सदस्य अमोल माळी यांनी धाव घेवून याची पोलिसांना व नातेवाईकांना माहिती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळुंखे करीत आहे.

अपघात की घातपात

मयत प्रविण भिसे व सुरेखा नाईक हे दोघे भिन्न भागात राहत असताना दोघे एकाच मोटरसायकलवरून कसे प्रवास करीत होते. दोघात नेमके काय संबंध होते, त्यातूनच त्यांचा अपघात झाला की घातपात केला अशी घटनास्थळी चर्चा होती.

Related Stories

सांगली : आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मिरजेत ट्रिमिक्स रस्त्याचे काम सुरू

Abhijeet Shinde

सांगली पोलिसांची धडक कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : ताकारी योजनेची विकासकामे ठप्प

Abhijeet Shinde

सांगली : खटाव येथे विहिरीत पडून चिमुरडीचा मृत्यू

Abhijeet Shinde

महापुराच्या प्रश्नावर महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री भेटणार

Abhijeet Shinde

तर एमपीएससी विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन – सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!