22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

लातुरमधील जवान हिमस्खलनात हुतात्मा

लातूर /  प्रतिनिधी

 लातुरमधील औसा तालुक्मयातील आलमला गावातील रहिवासी सुरेश गोरख चित्ते (वय 32) हे जम्मू-काश्मीरमध्ये हुतात्मा झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना झालेल्या हिमस्खलनामध्ये सुरेश चित्ते मृत्यूमुखी पडले. सुरेश चित्ते यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, दोन मुली आणि महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. सुरेश चित्ते हे 2004 मध्ये भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंट वन या तुकडीत सहभागी झाले. त्यांच्या निधनामुळे आलमला गावात दरवषी मकर संक्रातीला भरणारी यात्रा आणि स्पर्धा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सुरेश चित्ते यांचे पार्थिव शुक्रवारी 17 जानेवारीपर्यंत लातूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली. मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन जवानांचा, तर पाच नागरिकांचा समावेश होता. हिमस्खलनाच्या घटनेनंतर अनेक जण बेपत्ता असून, त्यामध्ये जवानांचाही समावेश आहे.

Related Stories

पक्षविरोधी वक्तव्याप्रकरणी TMC नेते कनिष्क पांडा निलंबित

datta jadhav

उत्तराखंडमध्ये साकारतेय औषधी उद्यान

Patil_p

इटलीमध्ये कोरोनाबळींची संख्या 9134 वर

tarunbharat

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

दिल्लीत एकाचा मृत्यू; 607 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

सीआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा

Patil_p
error: Content is protected !!