तरुण भारत

मध्यरात्री शेतवडीत ट्रक क्लिनरचा खून

प्रतिनिधी/ बेळगाव

मंगळवारी मध्यरात्री चित्रदुर्गमधील एका तरुणाचा बिअर बाटलीने व दगडाने हल्ला करून खून करण्यात आला आहे. जुने बेळगाव परिसरातील शेतवडीत ही घटना घडली असून शहापूर पोलिसांनी वडगाव येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याचे अन्य दोघे साथीदार फरारी झाले आहेत.

Advertisements

घटनेची माहिती समजताच बुधवारी सकाळी मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. खून झालेल्या युवकाच्या खिशातील आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. महम्मद समीउल्ला (वय 41, रा. चित्रदुर्ग) असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणी राजू लोकरे (वय 22, रा. मंगाईनगर, सहावा क्रॉस, वडगाव) याला अटक करण्यात आली आहे. रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याचे आणखी दोघे साथीदार फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महम्मद समीउल्ला हा मूळचा चित्रदुर्गचा आहे. नारळ भरून बेळगावला आलेल्या एका ट्रकचा तो क्लिनर होता. रविवारपेठमध्ये नारळ उतरविल्यानंतर महामार्गावर चालकाने ट्रक उभा केला. जेवण करून आज येथेच झोपून बुधवारी सकाळी चित्रदुर्गला निघूया, असे चालकाने सांगितले. मात्र, दोन दिवसांच्या प्रवासाने आपल्याला कंटाळा आला आहे. कंटाळा घालविण्यासाठी थोडी दारू प्यावी, म्हणून पैसे घेऊन समीउल्ला येडियुराप्पा मार्गावरील एका बारमध्ये गेला.

बारमध्ये दारू खरेदी केल्यानंतर वडगाव परिसरातील आणखी तीन तरुण त्याला भेटले. मिळून दारू पिताना धूम्रपान करण्यासाठी एकाने समीउल्लाकडे माचीस मागितला. त्यावर त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चौघेही बाहेर गेले. जवळच असलेल्या शेतात बसून पुन्हा सर्वांनी दारू ढोसली. त्यानंतर वाद उकरून काढून  बिअरची बाटली व दगडाने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात समीउल्लाचा मृत्यू झाला.

मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतवडीत पंचनामा करून समीउल्लाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. चित्रदुर्ग येथील त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. कंटाळा घालविण्यासाठी बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या समीउल्लाचा माचीसवरून हकनाक बळी गेला आहे. 

Related Stories

एनसीसी बेळगाव ग्रुपच्या शिबिराचा शुभारंभ

Amit Kulkarni

अवैधरित्या असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे हटविण्याचे आदेश

Amit Kulkarni

कर्नाटक: मंत्री एस.टी. सोमशेकर कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

लोकमान्य सोसायटीतर्फे सामाजिक संघटनांना धान्याचे वितरण

Omkar B

एसपीएम रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

शुभमंगल करताय सावधान…! केवळ 50 जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा

Amit Kulkarni
error: Content is protected !!