तरुण भारत

पोलिस कोठडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूरातील तुंगत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील संशयित आरोपीनेच पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अर्जुन शितोळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

Advertisements

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ,गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील तालुका पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणाऱ्या आरोपी अर्जुन शितोळे याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या संशयित आरोपीस तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील खासगी रुग्णालयात या आरोपीवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेमध्ये आरोपीने कोठडीत टॉवेलच्या सहाय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीवर बलात्काराचा आणि ॲट्रॉसिटीचा 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातच आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदरची घटना समजताच अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिस उपाधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी रुग्णालयात जाऊन आरोपीची भेट घेतली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती सध्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे

 

Related Stories

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात १८९ रुग्ण कोरोनामुक्त तर ४३ पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

‘कोविशील्ड’ लस आज सोलापुरात दाखल होणार

Abhijeet Shinde

सोलापूर : अन्यथा राज्यपाल कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करणार

Abhijeet Shinde

सोलापूर : एटीएम फोडून ११ लाख ४२ हजार लंपास केल्याप्रकरणी ६ संशयित आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी केली अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

Abhijeet Shinde

‘एमआयएम’ बी टीम तर काँग्रेस भाजपची ‘ये टू झेड’ टीम’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!