तरुण भारत

संक्रांतीनिमित्त मंगाईदेवीची विशेष आरास

बेळगाव / प्रतिनिधी :

मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी वडगावची ग्राम देवता श्री मंगाईदेवीची विशेष आरास करण्यात आली होती. तसेच देवीला 56 प्रकारचे भोग (नैवेद्य) दाखविण्यात आला. संक्रांतीनिमित्त करण्यात आलेल्या उपक्रमाचे वडगाव ग्रामस्थ तसेच भाविकांतून कौतुक करण्यात आले. बुधवारी विशेष आरास आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

देवीला तिळगुळाने आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. विविध फुलांनी पुष्पालंकार करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी मंदिर आवारात रेणुका देवी भाविकांसाठी श्री रेणुका देवी प्रतिकृती साकारण्यात आली होती. देवीला गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट अशा विविध 56 प्रकारचे भोग (नैवेद्य) दाखविण्यात आला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.

 

Related Stories

ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना ठरतेय डोकेदुखी

Omkar B

रोगवाढीमुळे ऊस उत्पादकात वाढली चिंता

Patil_p

गुरूवारी जिह्यात कोरोनाचे दहा रुग्ण

Amit Kulkarni

वैद्यकीय शिक्षण संस्थांविरोधात अभाविप आक्रमक

Amit Kulkarni

एनसीसी छात्रही मदतीसाठी पुढे सरसावले

Patil_p

वैद्यकीय कचरा विल्हेवारीसाठी खासगी प्रकल्पाकडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!