तरुण भारत

विक्रम भावेच्या जामिनावर 21 जानेवारीला निकाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

 पुणे / वार्ताहर :

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याने केलेल्या जामीन अर्जावर 21 जानेवारीला निकाल होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असून, जामिनावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला आहे.

भावे याच्या जामिनावर गुरुवारी निकाल होणार होता. मात्र, न्यायाधीशांना निकालासाठी पुढील तारीख दिली आहे. आई आजारी असल्याने तारखेला हजर राहता येणार नसल्याचा अर्ज या प्रकरणातील आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या वतीने ऍड. समीर पटवर्धन यांनी केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला. तर आरोपी शरद कळसकर याला किडनी स्टोनचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध असलेल्या दवाखान्यात उपचार करण्यात यावे, अशी विनंती बचाव पक्षाने न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने कळसकर याला आवश्यक असलेली वैद्यकीय सेवा पुरविण्यात यावी, असे आदेश कारागृह प्रशासनाला दिले आहेत. भावे याच्या अर्जावर 21 जानेवारीला निकाल झाल्यानंतर नियमित सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार आहे. ऍड. पुनाळेकर यांनी या गुन्हय़ातून वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अटी-शर्तींवर जामीन मिळाला आहे.

Related Stories

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अपप्रचारच होतोय – अविनाश धर्माधिकारी

prashant_c

प्रवासी कमी असल्यास एसटीच्या ‘लालपरीच्या’ फेऱ्या रद्द

triratna

लोणावळय़ातील वृद्धेच्या खुनाचा तीन दिवसात उलगडा

prashant_c

सोलापूर : कुर्डुवाडी – भिगवण विद्युतीकरण मार्गाला मिळाला हिरवा कंदील

triratna

सोलापूर शहरात 94 कोरोना पॉझिटिव्ह,एक मृत्यू

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये ३५७ कोरोनाबाधितांची भर

triratna
error: Content is protected !!