तरुण भारत

तिलारी कालव्याच्या सेतूवरुन पडून गोव्याचा तरुण ठार

प्रतिनिधी / चंदगड

स्वप्नवेल पॉईंटच्या अलिकडील तिलारी प्रकल्पाच्या कालव्यावरील सेतुवरुन पडून गोव्यातील तरुणाचा मृत्यू झाला.लोसेन सिद्धार्थ ब्रिंगेजा (वय 26, कोंडोलीम, गोवा) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी घडली. कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद सुतार यांनी घटनेची वर्दी चंदगड पोलिसांना दिली.

Advertisements

लोसेन ब्रिंगेजा हा आपल्या पल्सर गाडीने या सेतूवर आला होता. सेतूच्या बाजूला असलेल्या रेलिंगवरुन तोल जाऊन सुमारे 60 मीटर खोल खडकावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सेतूवर पल्सर असून गाडीशेजारी त्याचा मोबाईल होता. या घटनेची माहिती स्वप्नवेल हॉटेलचे मालक बी. के. कोतवाल यांनी पोलीस पाटलांना दिली. कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद सुतार यांनी घटनेची वर्दी चंदगड पोलिसांना दिली. पोलिसांनी मोबाईलवरुन मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा शोध घेतला. मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालयात शल्यचिकीत्सा करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्वप्नवेलच्या अलिकडील सेतुवरुन निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. त्या सेतुवरुन पडून मृत्यूमुखी पडल्याची ही पहिलीच वेळ आहे. चंदगड पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

अब्दूलाट महापूर घोटाळ्याची चौकशी करुन फेरसर्व्हे करा

triratna

कोरोना निगा केंद्राची सेवा देणारे गोवा हे एकमेव राज्य

Omkar B

मनोहर पर्रीकर यांना आज आदरांजली

Amit Kulkarni

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची आज मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी निदर्शने

Amit Kulkarni

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी त्वरीत ऑनलाईन नोंदणी करावी

Shankar_P

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह

Shankar_P
error: Content is protected !!