तरुण भारत

जम्मूतील 10 जिल्हय़ात इंटरनेट सेवा सुरू

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर घातलेले निर्बंध हळूहळू मागे

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर घातलेले निर्बंध हळूहळू हटवले जात आहेत. प्रशासनाने आता प्रीपेड सिमकार्डवरील व्हॉईस व एसएमएस सेवा पूर्ववत केल्या आहेत. तसेच पोस्टपेडवर इंटरनेट सेवाही सुरू केली आहे. दरम्यान, खासदारांचे पथक काश्मीर दौऱयावर जात असल्यामुळे येथे कडक सुरक्षाव्यवस्था व सतर्कता ठेवण्यात आली आहे.

राज्यातील एकंदर परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने जम्मू-काश्मीरमधील सर्व स्थानिक प्रीपेड सिमकार्डवरील व्हॉईस आणि एसएमएस सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी सांगितले. त्यानुसार जम्मूमधील सर्व 10 जिल्हय़ांमध्ये पोस्टपेडवरील इंटरनेट सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे. तथापि, सध्या बडगाम, बारामुल्ला, श्रीनगर, कुलगाम, अनंतनाग, शोपियाँ आणि पुलवामा येथे इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

Related Stories

पंजाब : मागील 24 तासात 3,329 नवे रुग्ण, 63 मृत्यू

Rohan_P

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आज राज्यांशी संवाद

Patil_p

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2984 वर 

Rohan_P

नववधूला उचलून घेत ओलांडली नदी

Patil_p

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 90 हजारांच्या उंबरठ्यावर

Rohan_P
error: Content is protected !!