तरुण भारत

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ माद्रीद

ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी होणाऱया सेव्हिला विरूद्धच्या सामन्यात रियल माद्रीद संघात करीम बेंझेमाचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान कर्णधार सर्जीओ रॅमोस आणि गॅरेथ बॅले याना दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागत आहे.

Advertisements

शनिवारच्या सामन्यासाठी प्रमुख प्रशिक्षक झिदानने 19 जणांचा रियल माद्रीदचा संघ जाहीर केला. या संघातील खेळाडूंनी शुक्रवारी येथे बराच सराव केला. घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे हेझार्ड या सामन्यात खेळू शकणार नाही. रियल माद्रीद संघातून आघाडीच्या फळीत खेळणाऱया बेंझेमाने लीग स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना 12 गोल नोंदविले आहेत. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोना 43 गुणांसह पहिल्या स्थानावर असून रियल माद्रीद 40 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. बार्सिलोनाने सेव्हिलाचा यापूर्वीच्या सामन्यात पराभव केला होता.

Related Stories

‘तो’ विक्रम न केल्याबद्दल युवराजने मानले आभार!

Patil_p

बाबर आझम पाकिस्तानचा नवा वनडे कर्णधार

Patil_p

मुंबई सिटीबरोबरच्या विघ्नेशच्या करारात वाढ

Patil_p

पीसीबीच्या संचालकपदी पहिली महिला

Patil_p

विराटकडे ना ख्रिस गेलची ताकद, ना एबीडीची क्षमता!

Patil_p

धोनीने वर्ल्डकपनंतर निवृत्त होणे योग्य ठरले असते

Patil_p
error: Content is protected !!