तरुण भारत

राष्ट्रीय महामार्गाची पाऊस्कर व उपमुख्यमंञी आजगावकर यांनी केली पाहणी

पेडणे  (प्रतिनिधी )

 राष्ट्रीय महामार्ग पञादेवी ते धारगळ महाखाजन पर्यंता रस्त्याच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंञी दीपक पाऊस्कर व उपमुख्यमंञी बाबू उर्फ मनोहर आजगावकर यांनी राष्ट्रीय महामार्ग बाधंकाम कंपनी अधिकारी , सरकारी बांधकाम खाते स्ता विभागाचे अभियंते यांच्या सोबत पञादेवी ते महाखाजन धारगळ पर्यतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी करुन विविध भागातील नागरिकांना रस्त्या बाबत  भेडसवणा-या समस्या सोडविण्याचे आदेश रस्ता  कंपनी अधिकारी तसेच सरकारी अधिकाऱयांना दिले.

Advertisements

 ड़  विर्नोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर विर्नोडा वासियांना भुयारी मार्ग करुन घेणारचः उपमुख्यमंञी बाबू आजगावकर

विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात आहे. माञ विर्नोडा ,  भुतवाडी या भागात सुमारे पाच हजार लोकवस्ती आसूनसुध्दा या भागातील नागरिकांना जाण्यासाठी भुयारी मार्गाची सोय केली नसल्याने या भागातील नागरिकांनी या संबधी सरकार व रस्ता विभागाचे लक्ष वेधण्यासाठी  पंचायत क्षेत्रातील नागरिकांची कृती समिती निवड करुन आंलोलन करण्याचे इशारा सरकार दिला होता.

  याची दखल घेत केंद्रीय आयुष मंञी श्रीपाद नाईक यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करुन विर्नोडा वासियांच्या भुयारी मार्ग बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रस्ता बांधकाम खात्याचे  अधिकारी  यांच्या उपस्थितीत देऊन तसे निर्देश दिले होते.

 त्यानंतर  सार्वजनिक बांधकाम मंञी दीपक पाऊस्कर आणि उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी राष्ट्रीय महामार्ग पञादेवी ते महाखाजन येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

   विर्नोडा येथे भुयारी मार्ग व्हावा व तेथील नागरिकांच्या मागणीची दखल सार्वजनिक बांधकाम मंञी व उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यंनी विर्नोडा येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या  यावेळी सरपंच प्रशांत राव, उपसरपंच अपर्णा परब,  पंच भरत गावडे , पंच शैलेद्र परब,  माजी सरापंच प्रदिप परब, कृष्णा परब, रेखा परब ,  देवेंद्र परब , सीताराम परब,सुरेश परब, संकेत आरोंदेकय, सुबोध नाडकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विर्नोडा वासियांनी विविध समस्या मांडला.वारंवार होणारे अपघात आणि विर्नोडा येथेयारी मार्ग उभारण्याची मागणी केली.आपण केंद्राकडे भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवितो व भुयारी मार्गाचा पाठपुरावा करणार असे आश्वासन दीपक पाऊस्कर व आजगावकर यांनी केले.

Related Stories

नेपाळातील टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी कांपालवर

Amit Kulkarni

पावसाने गोव्याला झोडपले

Amit Kulkarni

विजसाठी केजरीवाल मॉडल सर्वांत उत्तम

Patil_p

नागरी पुरवठा खात्याचे आवाहन

Patil_p

इंज्युरी वेळेतील राहुलच्या गोलने ब्लास्टर्सची बेंगलोरवर मात

Amit Kulkarni

शेळ मेळावली आयआयटी प्रकल्पासंदर्भात सविस्तरपणे माहिती द्या.

Omkar B
error: Content is protected !!