तरुण भारत

पोलिसांसाठी प्रत्येक जिह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप

 पुणे / प्रतिनिधी :

Advertisements

नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 13 व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱहे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शुटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलीस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय या गोष्टी होतच असतात. मात्र, या स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्वासावर नियंत्रण राखणारा मेंदूच्या योगाचा आणि मनःशांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे.

जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तोमर दादी या देशाच्या प्रेरणा आहेत. देशातील प्रत्येक पोलिसांचा नेम अचूक असणे आवश्यक आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. पोलिस व संरक्षण दलामुळेच सर्वसामान्य लोक निश्चिंत असतात. अचूकता आणि शिस्त हे पोलीस दलाचे वैशिष्टय़ आहे. विजेत्यांचे अभिनंदन मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

Related Stories

सोलापूर विद्यापीठाने 19.26 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केले परत !

Abhijeet Shinde

पाथरीत शेततळ्यात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Sumit Tambekar

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 342 नवे कोरोना पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पतंगाच्या मांजामुळे युवकाला 32 टाके

prashant_c

कोरोनामुक्त आ. गोपीचंद पडळकरांचे जेसीबीच्या सहाय्याने फुले उधळून स्वागत

Abhijeet Shinde

रूग्णालयांना फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!