तरुण भारत

सुरज निकम आणि विजय गुटाळ औंधच्या कुस्ती मैदानात भिडणार

वार्ताहर / औंध

औंध येथील श्रीयमाईदेवीच्या यात्रोत्सवानिमित येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याजवळील कुस्ती मैदानात कुस्त्याच्या जंगी आखाडा बुधवार दि 22 रोजी होणार असून प्रथम क्रमांकासाठी सुरज निकम (पुणे) विरुद्ध विजय गुटाळ (गंगावेश कोल्हापूर) महामुकाबला रंगणार असून कुस्ती आखाडयाची तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय आखाडय़ात अटीतटीच्या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. 

Advertisements

   श्रीयमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी,ग्रामस्थ औंध व श्रीमंत राजेसाहेब तालीम संघ औंध यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे भव्य कुस्ती  मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानात यंदा प्रथम क्रमांकासाठी मामासाहेब कुस्ती संकुलाचा सुरज निकम आणि विजय गुठाळ गंगावेश कोल्हापूर यांच्यात काटा लढत होणार आहे. दुस्रया क्रमांकावर विष्णू खोसे (सह्याद्री पुणे) आणि संतोष दोरवड (शाहुपुरी कोल्हापूर) यांच्यात सामना होणार आहे.

 संदीप काळे (पुणे) विरुद्ध राजेंद्र सुळ (सातारा) यांच्यात. चुरशीची लढत होणार आहे. 

  तसेच प्रशांत शिंदे (जाखणगाव) विरूध्द विकास. सुळ (सातारा), संदीप बोराटे क्रांती कुंडल. विरुद्ध सतपाल.सोनटक्के पुणे हे मल्ल परस्परांशी भिडणार आहेत.याशिवाय आणखीही नेत्रदिपक कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. शिवाय महिलांच्या देखील कुस्त्या आखाडय़ात होणार आहेत.

 छोटया गटातील कुस्त्यांची नोंदणी श्रीयमाई मंदिरात सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत केली जाणार आहे. 

    येथील कुस्ती मैदानास ऐतिहासिक परंपरा आहे.औंध संस्थानचे दिवंगत राजे कै.बाळासाहेब पंतप्रतिनिधी ,कै.श्रीपतराव पंतप्रतिनिधी,कै.बाळराजे यांनी मल्लांना राजाश्रय देऊन आपल्या संस्थानात नामवंत मल्ल घडविले होते.  गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी  श्रीमंत राजेसाहेब तालिम संघाच्या माध्यमातून औंध मध्ये सशक्त व बलदंड पिढी घडविण्याचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे.

मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुस्ती कमेटी अध्यक्ष वसंत माने, उपाध्यक्ष सदाशिव इंगळे, संतोष भोसले, सदाशिव पवार,वसंत जानकर, किसन आमले,नारायण इंगळे, हणमंतराव शिंदे,राजेंद्र माने,आब्बास आतार,प्रशांत खैरमोडे, रमेश जगदाळे,चंद्रकांत कुंभार,इलियाज पटवेकरी, बापूसाहेब कुंभार, सचिन शिंदे,रसुल शेख, दिपक नलवडे, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, वैभव हरिदास, व्ही.जी.शिंदे,अनिल माने किसन तनपुरे, आप्पा इंगळे, कुस्ती कमेटीचे सदस्य ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.जोतीराम वाजे, उमेश पाटील मैदानाचे समालोचन करणार आहेत.

Related Stories

ओटीपी मागून साताऱयातील महिलेला लाख रुपयांना गंडा

Patil_p

मी आलो म्हणजे शेतकयांना न्याय मिळणारच : प्रवीण दरेकर

Patil_p

सातारा : आकडा कमी पण पॉझिटिव्हीटी रेट जास्त

datta jadhav

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सातारच्या खेळाडूंची सोनेरी कामगिरी

Patil_p

लॉकडाऊन विरोधात व्यापारी रस्त्यावर

Patil_p

कराडकरांना दिलासा; रुग्णवाढीला लागतोय ब्रेक

datta jadhav
error: Content is protected !!