तरुण भारत

उच्च शिक्षण संचालनालयाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील विविध सरकारी, खासगी, महाविद्यालय व गोवा विद्यापिठात अध्यापन करणाऱया शिक्षकांच्या कार्य आणि कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी देण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कातर उच्च शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य पदावर कार्यरत असणाऱया दहा मान्यवरांनी या पुरस्कारावर मोहोर उमटवलेली आहे.

Advertisements

सन 2018-2019 वर्षासाठी डॉ. बी. आर श्रीनिवासन, डॉ. व्ही.व्ही. कामत, डॉ. रेखा गावकर, डॉ. विकास पिसुर्लेकर, डॉ. सिस्टर मारिया आराधना यांची निवड झाली आहे. तर 2019 ते 2020 वर्षाकरीता डॉ. आर.एस.गाड, डॉ. सविता केरकर, डॉ. विद्या देसाई, डॉ. राधिका नायक, डॉ. राजन मॅथ्यू यांचा समावेश आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने नव्याने कार्यान्वित केलेल्या योजनेद्वारे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. लवकरच या पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करण्यात येईल.

उच्च शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात येणाऱया उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. या पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष म्हणून गोवा विद्यापिठाचे उपकुलगुरु वरुण सहानी, तर  डॉ. मोहन सांगोडकर, डॉ. जयंत बुडकुले, डॉ. अजित परुळेकर यांनी सदस्य म्हणून काम पाहीले. तसेच उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहीले.

पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांचा परीचयः

2018-2019

डॉ. सिस्टर मारिया आराधना या कार्मेल महाविद्यालयाच्या प्राचार्य असून संगीत, कला, शिक्षण, सामाजिक उपक्रम, संशोधन या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे.

डॉ. विकास पिसुर्लेकर हे पीईएस महाविद्यालय, फर्मागुढु येथे प्राचार्यपदी कार्यरत असून रसायनशास्त्र या विषयामध्ये त्यांनी मौलिक कामगिरी बजावली आहे.

डॉ. रेखा गावकर या एमईएस महाविद्यालय, झुवारीनगर येथे सहयोगी पदावर कार्यरत असून अर्थशास्त्र विषयासंदर्भात त्यांनी विविध पदे सांभाळली आहेत.

डॉ. वेंकटेश कामत हे गोवा विद्यापिठातील संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे प्राध्यापक असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.

डॉ. बी. आर. श्रीनिवासन हे गोवा विद्यापिठात रसायनशास्त्र या विभागात प्रोफेसर असून अयटीएस आणि सीआरएसटी या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱया संस्थेचे सदस्य आहेत.

 

2019-2020

डॉ. आर. एस. गाड हे गोवा विद्यापिठातील इलेक्ट्रॉनिक विभागात सहयोगी व्याख्याता या पदावर कार्यरत असून त्यांना 21 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे.

डॉ. सविता केरकर गोवा विद्यापिठातील बायोटेक्नोलॉजी विभागात प्रोफेसर या पदावरती कार्यरत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध संस्थांना  त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.

डॉ. विद्या देसाई या ज्ञानप्रसारक मंडळ, आसगाव येथे सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत असून रसायनशास्त्र या विषयात पोस्ट डॉक्टरेट आहेत.

डॉ. राधिका नायक या धेंपो वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत असून अर्थशास्त्र विषय त्या शिकवतात, त्यांना 38 वर्षांचा अध्यापन अनुभव आहे.

डॉ. राजन मॅथ्यू हे कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय, केपे येथे क्रीडा विभागाचे प्रमुख असून सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

Related Stories

घाऊक मासळी मार्केटचा वाद शिंगेला आठ वाहनाची नासधुस

Patil_p

भाजप सरकारकडून जनतेची लूट

Amit Kulkarni

अवकाळी पावसामुळे कासावलीतील शेतकरी वर्ग हवालदिल

Patil_p

आम आदमी पक्षात राजीनामा सत्र

Patil_p

‘एक मनोहर कथा’ पुस्तक कोकणीतून यायलाच हवं..

Amit Kulkarni

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

Omkar B
error: Content is protected !!