तरुण भारत

मातृशक्तीचा सन्मान हा संस्कृतीचा आदेश

सद्गुरू ब्रह्म?शानंदाचार्य स्वामींचे आशीर्वचन

प्रतिनिधी/ मोरजी

Advertisements

नागरिकांद्वारे नारीचा सम्मान व्हायला पाहिजे. पुरुषांनी आपल्या घरातून स्त्री चा सम्मान करायला सुरवात होणे आवश्यक आहे. समाजाने कुटुंबासाहित जगणे महत्वाचे आहे. कारण यामधून संस्कृतीचे खरे दर्शन घडते. असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मांदे आयोजित नारायणि नमेस्तुते हा भव्यदिव्य सोहळा श्री भगवती सप्तेश्वर मंदिर जवळ मांदे पेडणे, गोवा येथे सुसंपन्न झाला. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

धर्मभूषण सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींच्या अधि÷ानखाली   श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमीद्वारे समाजात महिलांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मकि तसेच सामाजिक पातळीवर कार्य होत आहे. कालानुरुप समाजाची गरज व मानसिकता ओळखूनत्याप्रमाणे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात महिलांचे स्थान उंचविण्याबरोबरच सकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गार्गी, मैत्रेयी, आत्रेयी या ब्रह्मवादी स्रियांची उज्वल परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तिलाविशेष स्थान दिले आहे. अर्थातच ऋग्व?दकाळाचा विचार केल्यास स्त्रियांना वैदिक ज्ञान ग्रहण करण्याचे अधिकार पुरुषाच्या बरोबरीने होते.अशा दिव्य वैदिक परंपरेला अनुसरून विश्वातील मातृशक्तिला सामाजिक तथा धार्मिक क्षेत्रात अग्रेसर करून महिलांना सर्वोच्च स्थान प्राप्त व्हावे, या सद्हेतुने महिलांना सशक्त व आत्मकि बल देणारा “नारायणि नमो।़स्तुते” सन्मान नारीशक्तीचा… हा अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता.नारीशक्तिचा जाज्वल्य स्प?र्तीदायक अभिमान राखून “नारायणि नमेस्तुते” या कार्यक्रमाचे साक्षिदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय कार्यक्रमाला उपस्थित होतो. नारीशक्तीच्या जयजयकाराने अवघी मांदे भूमी दुमदुमदुमून गेली.

ङअँड्.ब्राह्मीदेवीजी                                                                       

गोव्याच्या महिलांचे नेतृत्व आज राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. नारीशक्तीची खरी ताकद नारायणि नमोस्तेते या कार्यक्रमातून सिद्ध होते आहे. महिलांनी आपली संस्कृती सांभाळून ठेवली आहे. हाच खरा अधिकार मातृशक्तीचा आहे. ही संस्कृती महिला जर सांभाळू शकते. पूर्ण विश्वाचे रक्षण यामध्ये दडलेले आहे. कुठल्याही देशातली स्त्री असू द्या संरक्षणाची जबाबदारी ही मातेकडे दिलेली आहे. असे प्रतिपादन सत्ग?रु फाउंडेशनच्या अध्यक्षा – अँड्. ब्राह्मीदेवीजी यांनी केले.

सुलक्षणा सावंत                                                                    या देशाला संस्कृती मिळालेली आहे ती आपल्याला सांभाळायची आहे.   देव हा आपल्याला सांभाळणारा आहे, आमचा प्रतिपाळ करणारा आहे. जसे शिक्षणाकडे, आपल्या करियरकडे, आपल्या सौंदयाकडे भरपूर वेळ देतो तसे देवाच्या गोष्टीकडेही आपण वेळ देणे गरजेचे आहे.   त्यासाठी आपल्या भावना, प्रेम याला किंमत देणे महत्वाचे आहे.   समाजासाठी काम करणे, धर्मासाठी काम करणे हे महत्वाचे असले पाहिजे. त्यामुळे समाजकार्यासह धर्मकार्यात महिला अग्रेसर होणे आवश्यक आहे. तीही स्त्री महत्वाची जी देवाचे, देशाचे, शिक्षणासाठी काम करते आणि धर्मासाठी काम करणारी स्त्री तेवढीच महत्वाची आहे. हेच या नारायणि नमोस्तेते कार्यक्रमाचे ध्येय आहे. असे प्रतिपादन भाजपा महिला अध्यक्षा सौ. सुलक्षणा सावंत यांनी केले.

                             ङपल्लवी धेंपे                                                                                :ङआपल्या भारतीय संस्कृतीचे संरक्षण मातृशक्तीने केले आहे. तपोभूमीचे शैक्षणिक कार्य आज अभिमास्पद आहे. कारण या कार्याचे नेतृत्व महिला करीत आहेत. विश्वभर चालेल्या गोष्टींसोबत आपण आपला धर्म आणि संस्कृती घेऊन पुढे जाऊ शकतो आणि त्याच गोष्टींची नितांत गरज आहे. स्वामी विवेकानंद  म्हणत आपल्या देशातील उपेक्षित स्त्रिया मुळे देश अविकसित राहिला देश खर्या अर्थाने विकसित व्हायचा असेल तर स्त्रियांना सन्मान प्राप्त होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पल्लवी धेंपे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना माजी शिक्षण मंत्री सौ संगीता परब यांनी पेडण्यातील किनारी भागातील ड्रग्स सारख्या अनैतिक गोष्टी बाबत चिंता व्यक्त करून अश्या अनैतिक गो÷ाrपासून दूर राहण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले

याप्रसंगी सौ दीपश्री सोपटे ,संचिता मांदेकर , सौ नीलिमा  मांदेकर ,सौ शमा आरोंदेकर  सौ सिद्धी आरोलकर यांनी आपले विचार मांडले

ङसंकल्प :ङ म्हादई आपली जीवनदायिनी असून संरक्षण हेतूने उपस्थित मातृशक्तीच्या साक्षीने संकल्प करुन मातृशक्तीने पुढे असा निर्धार करण्यात आला.

या सोहळय़ास पल्लवी धेंपो – संचालिका, धेंपो इंडस्ट्रीस्, अँड्. ब्राह्मीदेवीजी – अध्यक्षा, सत्ग?रु फाउंडेशन, सुलक्षणा सावंत – अध्यक्षा भाजप महिला मोर्चा व समाज सेविका, संगिता परब – माजी शिक्षणमंत्री गोवा राज्य, शमा आरोंदेकर – मामलेदार, दिपश्री सोपटे – समाज सेविका व शिक्षिका, संचिता मांदेकर – राष्ट्रीय छात्र सेवा भूदल क्मयडेट, अँड सिद्धी आरोलकर, सुवर्णलता वायगंणकर – संचालिका – श्री दत्त पद्मनाभ पीठ, दक्षता कालापूरकर – मँनेजर सद्गुरु ज्ञानपीठ तथा निलिमा मांदेकर – इंटरनँशनल सद्गुरु गुरुकुलम् आदि. विविध क्षेत्रातील नारीशक्ती मान्यवर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाची स्वागत व प्रस्तावना अँड्. ब्राह्मीदेवीजी यांनी केले. तर सुत्रसंचालन नम्रता परुळेकर व अंकीता पाडेलकर यांनी केले.

                                                                                                        

यावेळी उपस्थि“संकल्प मातृशक्तीचा “या शीर्षकाखाली केलेल्या संकल्प शपथ घेण्यात आली त्यातङ देव, देश,धर्म कार्यासाठी सर्वाना प्रोत्साहन देईन ,ङग्रहस्थाश्रमात नित्य देवपूजा ,तुळशी जलार्पण ,आदि धार्मिक विधीचे आचरण करीन ङ,मी माझ्या कुटुंबासोबत आठवडय़ातून एकदा मंदिरात जाईन,ङगृहस्थाश्रमात नित्य सायंकाळी धुपारती तथा प्रार्थना घेईन,ङधार्मिक सण परिवारासोबत एकत्रितपणे साजरा करीन ,ङदेशभक्तीने प्रेरित होवून देश कार्यासाठी सदोदित तत्पर राहीन ,देव देश धर्म,संत ,गोमाता,यांचा सदैव आदर राखीन ,ङवडिलधार्यांचा आदर ठेवून मुलानाही हेच संस्कार देईन ङ,मी माझे पातिव्रत्य सांभाळून पतिसेवा हाच धर्म मानून संसार करीनङ ,घरात कुणालाही अपशब्द उच्चारणार नाही ,संसारात आवश्यक तेवढाच खर्च करून उज्ज्वल भविष्यासाठी धनसंचय करीन ,स्वतःधर्म,सेवा आत्मसात करून घरातील सर्वाना हे संस्कार शिकवीन ,गावातील बंधुत्व टिकून राहण्यासाठी सदोदित कार्यरत राहीन,ङसामाजिक कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेईन ,शेजारी ,ग्रामस्थ,नातेवाईक वृद्ध यांच्याशी आदराचे सबंध प्रस्तापित करून ऋषीमुनींची “वसुधैव कुटुंबकम “ही संकल्पना मूर्तस्वरुपात आणीन ङ,धर्म भूषण सद्गुरू ब्राम्हेशानंद स्वामींची शिकवण आचरणात आणीन                                              

Related Stories

कोविडवरुन विरोधकांनी राजकारण करु नये

Omkar B

‘प्रॉपर्टी सावंत’ ही मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे, तर ते सत्यच!

Omkar B

शासकीय बंगल्याच्या बीलांवर मंत्र्यांची नावे

Patil_p

एटीके मोहन बागानकडून ओडिशाचा 4-1 गोलांनी फडशा

Patil_p

आज शिक्क्यातून व्यक्त होणार मतदारराजा

Patil_p

सासष्टीत शेती – बागायती, खासगी मालमत्तांचे 34 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni
error: Content is protected !!