तरुण भारत

दैवज्ञ सहकार बँकेवर सहकार पॅनेलची सत्ता कायम

बेळगाव / प्रतिनिधी

येथील नामवंत दैवज्ञ सहकार बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत बँकेच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी सत्ता कायम राखली. यावेळी 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलचे 8 उमेदवार विजयी झाले. तर रघुनाथ शेजेखान यांनीही विजय मिळविला. तर अनुसूचित जातीमधून ज्योतिर्लिंग जाधव, इतर मागासमध्ये जीवन दत्तात्रय वेर्णेकर आणि महिलांमध्ये (राखीव) कल्पना दिनकर अणवेकर, विनिता विश्वास शेठ या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisements

रविवारी सराफ गल्ली शहापूर येथील दैवज्ञ सहकार बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- अरुण नागेश रायकर- (288 मते), उदय गणपती रायकर- (306), उदयशंकर नागेश भट (295), गजानन (माणिक) अणवेकर (308), गणेश रमाकांत वेर्णेकर (343), मंजुनाथ शंकर शेठ (301), राजेश रमाकांत अणवेकर (312), सदानंद महाबळेश्वर रेवणकर (244), रघुनाथ शेजेखान (263).  निवडणूक अधिकारी म्हणून रेष्मा मकानदार यांनी काम पाहिले.

सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मत मोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी 6.45 च्या सुमारास निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला. 

Related Stories

कर्नाटक: राज्यात बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

triratna

सुरक्षिततच्यादृष्टीने उपायांची अंमलबजावणी होईल का?

Patil_p

संतिबस्तवाड ग्रा. पं. च्या अध्यक्षपदी विठ्ठल अंकलगी

Amit Kulkarni

कोरोना काळात लॅब टेक्निशियनची सेवा कौतुकास्पद

Omkar B

पोदार स्कूलतर्फे सायक्लोथॉन उत्साहात

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 420 जणांना कोरोनाची लागण

Patil_p
error: Content is protected !!