तरुण भारत

शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पहाणी करणार

ऑनलाइन टीम / मुंबई : 

दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडय़ाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार हे उद्या दुपारी 3.30 वाजता करणार आहेत.

Advertisements

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा देखील समावेश आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडय़ाची पाहणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री शरद पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुढील दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, उद्या पाहणीसाठी पवारंसोबत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.

 

Related Stories

कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपासून नियमित

prashant_c

भाजप अधिक बळकट होण्यास काँग्रेस जबाबदार – ममता बॅनर्जी

Abhijeet Shinde

”देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात आतापर्यंत 23 हजार 548 पोलिसांना कोरोनाची बाधा 

Rohan_P

पोलिसांचा गणवेश बदलणार ?

Abhijeet Shinde

नागरिकत्व कायद्याबाबत शिवसेनेची भूमिका कलुषित : आठवले

prashant_c
error: Content is protected !!