तरुण भारत

अनगोळ येथे युवकाची आत्महत्या

प्रतिनिधी /  बेळगाव

अनगोळ बाबले गल्ली येथील हनुमान टॉवर येथे एका युवकांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उजेडात आली आहे. अनगोळ बाबले गल्ली येथील हनुमान टॉवर येथे भांदूर गल्ली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरूण शिवाजी ताशिलदार वय वर्षे ४० असे युवकाचे नाव आहे. यांच्या पश्चात पत्नी व एक लहान ७ वर्षाची मुलगी ही आहे. अरूण हा दारूच्या आहारी गेलेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो सेंट्रींगच्या कामानिमित्त बाहेर गावी जात असे . आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. पण त्याला दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे त्याला पोटात दुखण्याचा त्रास जाणवत होता आणि यालाच कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मिळाली आहे. रविवारी सायंकाळी तो कुणालाही न सांगता घरा बाहेर पडला आणि सोमवारी सकाळ पर्यंत घरीच आला नाही. त्यामुळे घरच्यांनी इतरत्र शोधाशोध केली. पण काहीच पत्ता लागला नाही म्हणून सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सकाळी हनुमान टॉवर येथील कांही विद्यार्थी वरच्या मजल्यावर गेले असता त्या ठिकाणी एक युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निर्देशनात आले. लागलीच त्या युवकांनी हनुमान टॉवर येथे एका इसमाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले व याची माहिती घेतली. ओळख पटविण्यासाठी ताशिलदार कुटुंबीयांना याची माहिती दिली व गल्लीतील कांही युवकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहताच तो मृतदेह अरुणचा असल्याचे पटल्यावर त्याच्या पत्नीला कळविण्यात आले. यावेळी टिळवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठविण्यात आला. आणि नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisements

Related Stories

फार्मसी विद्यार्थ्याची बेळगावात आत्महत्या

Amit Kulkarni

गुंजी माऊलीदेवी यात्रोत्सवाची सांगता

Amit Kulkarni

कुद्रेमनी ग्रामस्थांची अडवणूक करु नका

Rohan_P

सिटी बसने घेतला विद्यार्थ्याचा बळी

Rohan_P

साई कॉलनी गणेशोत्सव मंडळातर्फे कृत्रिम तलावाची सोय

Patil_p

गारुडय़ांकडील साप सोडला जंगलात

Patil_p
error: Content is protected !!