तरुण भारत

जे. पी. नड्डा भाजपाध्यक्षपदी

बिनविरोध निवड : अभाविप ते अध्यक्षपद असा 30 वर्षांचा प्रवास

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जगतप्रकाश (जे. पी) नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांची सोमवारी या पदावर रीतसर नियुक्ती करण्यात आली. येथील भाजप मुख्यालयात झालेल्या एका शानदार कार्यक्रमात त्यांनी पक्षसूत्रे हाती घेतली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र मावळते अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाल अद्याप पूर्ण व्हावयाचा असल्याने त्यांची पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती लांबणीवर पडली होती. आता त्यांना ती संधी मिळाली आहे.

नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील आहेत. मात्र त्यांनी पक्षकार्य प्रामुख्याने बिहारमध्ये केले आहे. ते कुशल संघटक आणि निष्णात धोरणकर्ते म्हणून ओळखले जातात. ते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विश्वासातील आहेत.

अभाविपपासून प्रारंभ

नड्डा यांच्या सार्वजनिक जीवनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेपासून प्रारंभ झाला होता. ते त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात अत्यंत क्रियाशील म्हणून ओळखले जात होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षातून आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. टप्प्याटप्प्याने प्रगती करत त्यांनी पक्षातील अनेक महत्वाची पदे अत्यंत सक्षमपणे भूषविली. ते पक्षाचे उपाध्यक्ष, महासचिव व अनेक राज्यांचे प्रभारी राहिले आहेत. उत्तर भारतात पक्षाच्या विस्ताराला त्यांचा मोठा हातभार लागला आहे. आता त्यांच्यासमोर दक्षिणेचे आव्हान आहे.

नड्डा अतिशय योग्य

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जगतप्रकाश नड्डा हे अत्यंत योग्य आणि चपखल व्यक्ती आहेत, अशा शब्दात मावळते पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा गौरव केला. ते पक्षाचा विस्तार झपाटय़ाने करतील. देशभरात पसरलेल्या भाजपच्या कोटय़वधी कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या विश्वासाला ते न्याय देतील अशी भावना इतर अनेक नेत्यांनी व्यक्त केली.

बॉक्स

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आजवर अनेक ज्येष्ठांनी भाजपची धुरा सांभाळली. पक्षासाठी उच्च परंपरा निर्माण केली. नड्डा या परंपरेला अधिक उज्ज्वल बनवितील अशा विश्वास व्यक्त करतानाच नड्डा यांच्याकडून उच्चकोटीच्या अपेक्षा असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. इतर नेत्यांनीही नड्डा यांचे कौतुक केले.

Related Stories

राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

Patil_p

सोनिया गांधींविरुद्ध शिमोग्यात एफआयआर

Patil_p

गावी परतणाऱया कामगारांना मोफत प्रवास

Patil_p

एमएसएमईसाठी आता दुप्पट तरतूद

Patil_p

ब्लॅक टॉप पोस्टवर भारताचा कब्जा

datta jadhav

दरातील घसरणीमुळे सोने ग्राहकात उत्साह

Patil_p
error: Content is protected !!