तरुण भारत

फलंदाजीत विराट-रोहित, गोलंदाजीत बुमराह आघाडीवर

दुबई / वृत्तसंस्था

भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा या जोडीने आयसीसी वनडे मानांकनात फलंदाजांच्या यादीत पहिले दोन क्रमांक संपादन केले तर गोलंदाजांच्या यादीत जसप्रित बुमराह अव्वल ठरला. सोमवारी आयसीसीने ताजी मानांकन यादी जाहीर केली.

Advertisements

अलीकडेच संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने बाजी मारल्यानंतर कोहली पहिल्या स्थानी तर रोहित दुसऱया स्थानी भक्कम राहिले. या मालिकेत 183 धावांसह कोहली मालिकावीर राहिला तर रोहितनेही 171 धावांचे योगदान दिले होते. बेंगळुरात झालेल्या निर्णायक लढतीत रोहितने सामना जिंकून देणारी 119 धावांची खेळी साकारली होती.

सध्या कोहलीच्या खात्यावर 886 व रोहितच्या खात्यावर 868 गुण असून पाकिस्तानचा बाबर आझम 829 गुणांसह तिसऱया स्थानी आहे. डावखुरा सलामीवीर शिखर धवन 2 डावातील 170 धावांसह फलंदाजांच्या यादीत 15 व्या स्थानी झेपावला आहे. बेंगळूरमधील तिसऱया लढतीत तो खेळू शकलेला नाही. तिसऱया वनडेत सलामीला उतरणाऱया केएल राहुलनेही आपल्या लक्षवेधी योगदानाच्या बळावर 50 वे स्थान प्राप्त केले. स्टीव्ह स्मिथचे मानांकन 4 अंकांनी वधारत तो 23 व्या स्थानी आला. याशिवाय, डेव्हिड वॉर्नर 6 व्या तर ऍरॉन फिंच 10 व्या स्थानी पोहोचले. यष्टीरक्षक-फलंदाज ऍलेक्स कॅरे 31 व्या स्थानी आहे.

गोलंदाजांच्या यादीत बुमराह 764 गुणांसह अव्वलस्थानी असून न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट व अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हे देखील पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहेत.

भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा गोलंदाजांच्या यादीत 27 व्या स्थानी पोहोचला. त्याने मालिकेत 4 बळी घेतले. याशिवाय, दोन डावात 45 धावा जमवत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा 10 व्या स्थानी राहिला आहे.

Related Stories

इंग्लंड महिलांचा भारतावर वनडे मालिका विजय

Amit Kulkarni

जोकोविचच्या गैरहजेरीने नदाल, मेदव्हेदेवला संधी

Patil_p

इंग्लंडच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट

Patil_p

सौराष्ट्रचे नेतृत्व उनादकटकडे

Amit Kulkarni

इंग्लंडच्या मालिका विजयात बटलरची चमक

Patil_p

तामिळ थलैवाज-यू मुम्बा रोमांचक लढत टाय

Patil_p
error: Content is protected !!