तरुण भारत

ताडी विक्री करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शेंद्रे (ता. जि. सातारा) येथे सुरु असलेल्या रासायनिक ताडी बनवून विक्री करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहन चांगदेव यादव (वय 58, दत्तछाया कॉलनी शाहुपुरी सातारा), राहूल धर्मांण्णा गोळसर (रा. योदोगोपाळ पेठ, सातारा) व किशोर नरसय्या गौड (वय 38, रा. साईबाबा मंदिराजवळ गोडोली, मुळ रा. कोतापल्ली, ता. जि. करीमनगर राज्य तेलंगणा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

Advertisements

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे येथे मनुष्याचे जिवीतास धोका निर्माण होणारी रसायनयुक्त ताडी बनवून विक्री करणारे रॅकेट कार्यरत होते. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये अवैद्य दारूविक्रेतांवर कारवाई करण्याबाबत  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डीबी पथकास कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार शेंद्रे येथे माळ नावच्या शिवारात चोरटी बेकादेशीरपणे ताडी विक्री होत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्या ठिकाणी जावून खात्री केली असता  रसायनयुक्त ताडीची विक्री होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा टाकून रसायनयुक्त ताडी व तेथील ताडी विक्रेत्यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, ताडी बनविण्याच्या ठिकाणी त्याने समक्ष दाखविले. शहराचे हद्दीमध्ये भरवस्तीत एका गाळयामध्ये एक इसम रसायनयुक्त ताडी बनवित असताना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून ताडी व इतर माल जप्त करण्यात आला.

रसायनयुक्त ही ताडी मानवी जिवीतास अपायकारण असल्याने ताडी विक्रेता व ताडी बनविणाऱयाच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. भोसले करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  एस. बी. भोसले, पोलीस हवालदार दादा परिहार, विकास मराडे, पोलीस नाईक सुजीत भोसले, समीर महांगडे, नीलेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम,  संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात यांनी सहभाग घेतला.

Related Stories

वीज वितरण आधिकारी रंगेहात लाचलुचपच्या जाळ्यात

Patil_p

कासट मार्केटमधील अतिक्रमीत टप्रयाना चोरटय़ाचे ग्रहण

Patil_p

डॉ. सुरेशबाबांनी सर्व सभासदांना समान न्याय दिला

Amit Kulkarni

वाई तालुक्यातील शिरगाव येथील केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

सातारा : गेल्या 24 तासात सरासरी 19.28 मि.मी. पाऊस

Abhijeet Shinde

मंगलमय : कोरोनामुळे रखडलेले सोहळे धुमधडाक्यात

datta jadhav
error: Content is protected !!