तरुण भारत

‘झोमॅटो’ ने 35 कोटी डॉलर्सनी खरेदी केला उबर इट्सचा भारतीय व्यवसाय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ऑनलाइन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणारी प्रसिद्ध कंपनी ‘झोमॅटो’ ने ‘उबर इट्स इंडिया’ कंपनीला विकत घेतले आहे. झोमॅटो कंपनीने उबर इट्सचा भारतीय व्यवसाय तब्बल 35 कोटी डॉलर म्हणजेच 2485 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

Advertisements

यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ 9.99 टक्के हिस्साच असणार आहे. ‘उबर इट्स’चा आता भारतात स्वतंत्र व्यवसाय न राहील्यामुळे त्यांच्या युजर्सना झोमॅटोच्या ऍपवर जोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी ‘उबर’चा खाद्य पदार्थ पुरवणाऱया शाखेचा भारतात चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. उबरच्या धोरणानुसार जर कंपनी मार्केटमध्ये पहिल्या किंवा दुसऱया स्थानावर नसेल तर ती तो व्यवसाय सोडून देते. याच धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीचे हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच आहे. जगातील इतर देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही.

 

Related Stories

दिलासादायक : पंजाबमध्ये एका दिवसात 508 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

कोरोनाविरोधात ‘शांतता’युद्ध सुरू

tarunbharat

देशात 48 हजार 916 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

देशात 2.66 लाख कोरोनाबाधित

datta jadhav

माजी मंत्री चिन्मयानंद यांना जामीन

Patil_p

राहुल गांधींनंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!