तरुण भारत

ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

‘बुशफायर रिलीफ मॅच’ 8 फेब्रुवारीला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

Advertisements

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीने विस्कळीत झालेले शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी ‘बुशफायर रिलीफ मॅच’ सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श हे दोघे वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, वॉर्न यांनी निधी गोळा करण्यासाठी या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. मदतीसाठी 8 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या या क्रिकेट सामन्यात भारताचा मास्टल ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा महान माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श सज्ज आहे.

मात्र, दोघेही दिग्गज यंदा बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळताना नाही तर एका वेगळय़ाच भूमिकेत दिसतील. सचिन आणि वॉल्श अनुक्रमे पींटिंग इलेव्हन आणि वॉर्न इलेव्हनच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहेज. सचिन सोबत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाही बोलावण्यात आले आहे.

या सामन्यातून कमावलेला सर्व निधी ऑस्ट्रेलियन रेडक्रॉस आपत्ती निवारण आणि पुर्नप्राप्ती निधीकडे दिला जाणार आहे.

 

 

Related Stories

भारतीय नेमबाज 16 जुलैला टोकियोला प्रयाण

Amit Kulkarni

नेतृत्व विभागणीची संकल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही

Patil_p

जी.साथियान विजेता

Amit Kulkarni

जेव्हा नेटवर्कसाठी आयसीसी पंचांना झाडावर चढावे लागते!

Patil_p

रणजी क्रिकेट स्पर्धा डिसेंबरपासून,

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयात 5 कसोटी होणे अशक्य

Patil_p
error: Content is protected !!