20.8 C
Belgaum
August 8, 2020
तरुण भारत

आंतरराष्ट्रीय ई-तिकीट रॅकेटचा पर्दाफाश

पाकिस्तान, बांगलादेश, दुबईमध्ये कनेक्शन : दहशतवादाला वित्तपुरवठा होत असल्याचा यंत्रणांना संशय, हामिद अरशफ मुख्य सूत्रधार

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

दुबई, पाकिस्तान, बांगलादेशशी संबंधित असलेल्या ई-तिकीट रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मंगळवारी खुलासा केला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून दहशतवादाला वित्तपुरवठा होत असल्याचा संशय आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी व्यक्त केला आहे. या रॅकेटचा म्होरक्या दुबईमध्ये असून चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2400 शाखांमध्ये खाती आढळून आली आहेत.

अलिकडच्या काही वर्षांमधील तिकिटांच्या गोरखधंदय़ावरील ही सर्वात मोठी कारवाई असून आरपीएफने झारखंडच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित आरोपीचा दहशतवादाला होणाऱया वित्तपुरवठय़ात सहभाग राहिला आहे. गुलाम मुस्तफा नाव असलेल्या आरोपीला भुवनेश्वर येथून अटक करण्यात आली आहे. गुलाम मुस्तफा हा मदरशात शिकला असला असून त्याला सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचे ज्ञान प्राप्त आहे.

563 ओळखपत्रे हस्तगत

गुलाम मुस्तफा याच्याकडे आयआरसीटीसीची 563 वैयक्तिक ओळखपत्रे आढळून आली आहेत. तसेच एसबीआयच्या 2400 तर क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या 600 बँकांमध्ये त्याची खाती असल्याचा संशय आहे.

एनआयए, आयबीकडून चौकशी

ई-तिकीट रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुलाम मुस्तफा याची मागील 10 दिवसांमध्ये आयबी, स्पेशल ब्युरो, ईडी, एनआयए आणि कर्नाटक पालिसांनी चौकशी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला होणाऱया वित्तपुरवठय़ाशी या रॅकेटचे कनेक्शन असल्याचा संशय आहे.

बॉम्बस्फोटात हात

रॅकेटचा सूत्रधार सॉफ्टवेअर डेव्हलपर हामिद अशरफ 2019 मध्ये गोंडा येथील शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात सामील होता. हामिद सध्या दुबईत वास्तव्यास असल्याचा संशय आहे. गोरखधंदय़ांमधून हामिद  प्रत्येक महिन्याला 10 ते 15 कोटी रुपये कमावित असल्याचा आरपीएफ महासंचालकांनी सांगितले आहे.

पैशांची देवाणघेवाण

या गोरखधंद्यातून प्राप्त होणारा पैसा भारतातील एका सॉफ्टवेअर कंपनीत गुंतविण्यात आला आहे. रॅकेटद्वारे भारतातून हवालामार्गे विदेशात रक्कम पाठविली जाते. अनेकदा बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे विदेशात पाठविले गेले आहेत. या रकमेचा टेरर फंडिंगसाठी वापर होत असल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. यंत्रणांनी तातडीने पावले उचलली आहेत.

रॅकेटची कार्यपद्धत

हामिदच्या रॅकेटमध्ये सुमारे 20 हजार जण रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करत आहेत. या रॅकेटमध्ये ‘गुरुजी’ नावाचा व्यक्ती सामील असला तरीही त्याचे मूळ नाव स्पष्ट झालेले नाही. गुरुजी नावाचा व्यक्ती या रॅकेटसाठी रेल्वेच्या तिकीट नोंदणी सॉफ्टवेअरला हॅक करतो. सर्वसाधारपणे तिकीट नोंदणीच्या पूर्ण प्रक्रियेला 3 मिनिटांचा वेळ लागतो. पण केवळ एका मिनिटात तीन तिकीट आरक्षित होतील, असे सॉफ्टवेअर गुरुजीने तयार केले आहे. तर मुख्य सूत्रधार गुलाम मुस्तफाच्या मदतीला अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर असून त्यांना महिन्याला 28000 रुपये मिळतात. हेच लोक देशभरातील 20 हजार तिकीट एजंट्सच्या संपर्कात राहतात.

Related Stories

सीमेवर दोन ड्रोन पाडविण्यात यश

Patil_p

फारुख अब्दुल्लांची स्थानबद्धतेतून सुटका

tarunbharat

पाकिस्तानमधून ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी

datta jadhav

महाराष्ट्रातील वाढवण येथे मोठे बंदर उभारायला तत्वतः मंजुरी

prashant_c

पदवी अंतिम वर्ष-सेमिस्टर वगळता इतर विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p

कोलकाता : कैलास विजयवर्गीय ताब्यात

Patil_p