तरुण भारत

तहसील कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

प्रतिनिधी / कडेगाव

तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर आनंद विनायक कोरे ( वय 35) याने महा ई सेवा केंद्रामध्ये येणाऱया ग्राहकांचे शासकीय दाखले तहसील कार्यालयातून मंजूर करून देण्याकरीता तीन हजार  रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवार (दि. 21) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात आनंद कोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची वांगी येथे दिशा महा ई सेवा केंद्र नावाचे सेवा केंद्र आहे. हा महा ई सेवा केंद्रामध्ये येणाऱया ग्राहकांचे शासकीय दाखले तहसील कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी तहसील कार्यालय कडेगाव येथील रोजगार हमी सेवक ( डाटा एन्ट्री ऑपरेटर) आनंद कोरे हा प्रति महिना दोन हजार रुपये लाचेची मागणी करीत होता. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली येथे (दि. 21) जानेवारी रोजी कोरे विरोधात तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱयांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत कडेगाव तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर कोरे याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी करून हे पैसे स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, सुषमा चव्हाण या पोलीस उपाधीक्षक अधिनाथ बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस कर्मचारी संजय कलगुटगी, अविनाश सागर, भास्कर मोरे, जितेंद्र काळे, रवींद्र धुमाळ, संजय संकपाळ, राधिका माने, अश्विनी कुकडे ,बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली.

Related Stories

सांगली : दिघंचीत चाकुच्या धाकाने भरदिवसा ज्वेलर्स लुटले

Abhijeet Shinde

सांगली : कडेगाव कोरोना लसीकरणासाठी मुहूर्त मिळेना

Abhijeet Shinde

जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे आठ जागा जिंकत सत्तांतर

Abhijeet Shinde

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पत्रकार गिरीश कुबेरवर गुन्हा दाखल करा

Abhijeet Shinde

पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस आता कोल्हापूरपर्यंत धावणार

Abhijeet Shinde

मिरज कोविड रुग्णालयात मिळणारे जेवण निकृष्ठ दर्जाचे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!