तरुण भारत

फास्टटॅग मुळे टोलवरील वाहतूक कोंडी थांबली

वार्ताहर/ आनेवाडी

सातारा जिह्यात असणाया टोल नाक्या पैकी आनेवाडी टोल नाका नेहमी होणाया वाहतूक कोंडी च्या समस्ये ने कायम चर्चेत होता,दर शनिवार व रविवार या दिवशी कायम वाहतूक टोल नाक्या पासून एक दोन किलोमीटर पर्यंत वहांनाच्या रांगा लागल्या जात,मात्र केंद्र सरकारच्या आदेशाने सर्वच टोल नाक्यावर फ़ास्ट टॅग प्रणाली कायम स्वरूपी अनिवार्य करण्यात आल्याने टोल वर होणारी वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून त्यामुळे वाहन धारक समाधानी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisements

          केंद सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आनेवाडी टोल नाक्यावर येथील टोल प्रशासनाने चांगल्या पद्धतीने राबविल्याने मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक वहानधारक यांनी स्वतःच्या वहानांच्या वर फ़ास्ट टॅग लावल्याने नियमित होणारी वाहतूकीची समस्या कमी झाली असून यामुळे वहानधारकांच्यात व टोल कर्मचारी यांच्यात होणाया वादा वादी यामधे देखील लक्षणीय घट झाली असून सोबतच वेळेची बचत तसेच इंधन बचत होवून होणारे आर्थिक नुकसान वहानधारकांचे कमी होण्यास मदत होत आहे,आनेवाडी टोल नाक्यावर फ़ास्ट टॅग प्रणाली करिता सर्व लेनवर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून,अजुन पर्यंत ज्यानी फ़ास्ट टॅग बसविले नाहीत अश्या वहानांच्या करीत एक लेन रोख टोल घेण्यासाठी ठेवण्यात आली असून,बाकीच्या सर्व लेन हया फक्त फ़ास्ट टॅग वाहनचालकांच्या साठि असून या लेनवर जर विना फास्ट टॅग चे वाहन आल्यास त्यास दुप्पट रकमेचा टोल भरावा लागणार आहे

         फ़ास्ट टॅग बसविण्याकरिता सर्व राष्ट्रीय बँका मार्फत सोय करण्यात आली असून सोबतच आनेवाडी टोल नाक्यावर देखील या करिता विशेष फास्ट टॅग बसविण्या करिता अल्प दरात यंत्रणा सुरु करण्यात आली असून याचा सर्व वहानधारकांनि लाभ घेण्याचे आव्हान टोल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,फ़ास्ट टॅग बसविल्याने सोबत टोल साठी रोख रक्कम ठेवण्याची गरज नसून ज्यावेळी वहानधारक टोल पास करून जाईल त्याच वेळी त्याचा खात्यामधून रक्कम टोल साठा वसूल केली जाणार आहे,त्याच बरोबर आनेवाडी टोल नाक्याच्या वीस किलोमीटर अंतरा मधील स्थानिक वहांनाच्या करीत 265 रुपए चा महिन्याचा फ़ास्ट टॅग पास मिळणार असून तो आनेवाडी टोल वरच चालणार असून यातून एका महिन्यात किती ही वेळा वहानधारक प्रवास करु शकतो,

           आनेवाडी टोल नाक्यावरून फ़ास्ट टॅग प्रणाली सुरु करण्या करिता दररोज तीस ते चाळीस वहानधारक येत असून यामधे स्थानिकाना देखील सवलत दिल्याने होणारी वाहतूक कोंडी रोजचे वाद विवाद कमी झाले असून,सर्व वहानधारकांनी फ़ास्ट टॅग यंत्रणा आपल्या वहांनाच्या करिता लावून घ्यावी

   विवेक शर्मा ,व्यवस्थापक आनेवाडी टोल प्लाझा 

         रोख रकमेचा रिटर्न टोल बंद

चोवीस तासात पुन्हा टोल वर रिटर्न येणाया वहानांच्या करिता टोल मधे सवलत पहिल्यांदा दिली जात होती,मात्र फ़ास्ट टॅग प्रणाली मधे रोख रिटर्न टोल सुविधा बंद करण्यात आली असून, फक्त फ़ास्ट टॅग धारक यांच्या साठीच रिटर्न टोल मधे सवलत दिली जाणार आहे,त्यामुळे रोख टोल देणाया वहांनाच्या साठी चोवीस तासात परत येताना सिंगल प्रवासाचाच टोल द्यावा लागणार आहे

Related Stories

घंटागाडी देवू लागली नवा संदेश

Patil_p

वाई पोलिसांचा तृप्ती लॉजवर छापा

Patil_p

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

शहरात वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव

datta jadhav

सातारा : खबालवाडीत आणखी दोन रुग्णांची भर

Abhijeet Shinde

शिवराज्यभिषेकाच्या दिनानिमित्त खाकीचेही रक्तदान

Patil_p
error: Content is protected !!