तरुण भारत

विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी/ पणजी

कला अकादमीने दिनानाथ मंगेशकर कलामंदिर पणजी येथे 13 ते 17 जानेवारी दरम्यान घेतलेल्या विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. राजमाता पद्मावती राजे सौंदेकर हायस्कूल रामनाथी बांदोडा फोंडा यांनी सादर केलेल्या कलाकार या कोकणी तर पिपल्स हायस्कूल मळा पणजी यांच्या दर्दपोरा या मराठी एकांकिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Advertisements

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :

कोकणी विभाग

व्ही. डी. ऍण्ड एस. व्ही. वागळे हायस्कूल मंगेशी फोंडा यांनी सादर केलेल्या एका न्हयेचो पूनर्जल्म या एकांकिकेस दुसरे तर शिक्षा सदन प्रियोळ म्हार्दो यांनी सादर केलेल्या देवली दुकां या एकांकिकेस तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल केरी फोंडा यांनी सादर केलेल्या वर्सल व सारस्वत विद्यालय खोर्ली म्हापसा यांनी सादर केलेल्या कालचक्र या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

उत्कृष्ट अभिनय पुरुष गटात सुशांत पोकले – बबन (कलाकार) रजमाता पद्मावती राजे सौंदेकर हायस्कूल रामनाथी बांदोडा फोंडा यांना प्रथम तर गौराक्ष रमाकांत गावडे – भुरगो (देवली दुकां) शिक्षा सदन प्रियोळ-म्हार्दोळ यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर सुयश गावडे – उदय (भुतावळी), मीत आरोलकर -शंकू  (भुतावळी), सिद्धांत गावडे – जाण्तेलो (एका न्हंयचो पूनर्जल्म), ओंकार गावडे – गोपाळ (एका न्हंयचो पूनर्जल्म), कार्तिक घैसास – बेबदो (एका न्हयंचो पूनर्जल्म), मिथील नाईक – मधू (वर्सल) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली.

उत्कृष्ट अभिनय स्त्राr गटात मानसी यादव – माई (देवलीं दुका) शिक्षा सदन प्रियोळ म्हार्दोळ यांना प्रथम तर शेया केरकर – मंगल (वर्सल) सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल केरी फोंडा यांना दुसरे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच धनश्री नाईक – शिक्षिका (कालचक्र), युक्ता देसाई – जया (कलाकार), निमिशा प्रभू – जाण्टेली (देवलीं दुका) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अमोघ प्रसाद बुडकुले (एका न्हंयचो पूनर्जल्म), दुसरे अनंत बांबोळकर (कलाकार) तर उल्हास यशवंत नाईक (देवाली कृपा) यांना तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. उत्कृष्ट नेपथ्यासाठाr अनुप आनंद नाईक (देवाली कृपा), प्रशस्तीपत्रासाठी कन्हैया नाईक (एका न्हंयचो पूनर्जल्म), उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी दामोदरराज बांबोळकर (कलाकार), प्रशस्तीपत्रासाठी सुरज गवाणेकर (देवाली दुकां), उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठाr प्रितेश पवार (वर्सल) प्रशस्तीपत्रासाठी तन्मय गावडे (कलाकार), उत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रथम (भुतावळी) प्रशस्तीपत्रासाठी विष्णू गावस (कालचक्र), उत्कृष्ट वेशभूषेसाठी कृष्णा नायक (देवाली दुकां) प्रशस्तीपत्रासाठी समीर शेटकार (भुतावळी), उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम पारितोषिक दत्तराम कामत बांबोळकर (एका न्हंयचो पूनर्जल्म) तर सावळो पालयेकर (कालचक्र) यांना दुसरे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

मराठी विभाग

श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण काणकोण यांनी सादर केलेल्या बुजगावणे या एकांकिकेस दुसरे तर श्री गणेश हायस्कूल गणेशपुयी म्हापसा यांनी सादर केलेल्या गोड गुपीत या एकांकिकेस तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. निराकार विद्यालय माशे काणकोण यांनी सादर केलेल्या फाशी तर तुडल हायस्कूल तुडल गावडोंगरी काणकोण यांनी सादर केलेल्या उंच माझा झोका या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

उत्कृष्ट अभिनय पुरुष गटात स्वस्तिक नाईक – बाबलो (बुजगावणे) श्रद्धानंद विद्यालय पैंगीण काणकोण यांना प्रथम पारितोषिक तर अथर्व उपाध्ये – आकाश (गोड गुपीत) गणेश हायस्कूल गणेशपुरी म्हापसा यांना दुसरे पारितोषिक प्राप्त झाले आहे. अमन पैंगीणकर – भगत सिंग (फाशी), नहुष अध्यापक – विशू (दिलासा) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.

उत्कृष्ट अभिनय स्त्री गटात राजसी नाईक – मुस्कार (दर्दपोरा), पिपल्स हायस्कूल मळा पणजी यांना प्रथम तर श्रेया प्रभू – फाशी (फाशी) निराकार विद्यालय माशे काणकोण यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. आक्रिती परब – अनामिका (गोड गुपीत), प्राप्ती मांद्रेकर – जिंगी (गोड गुपीत), श्वेता वेळीप – आई (उंच माझा झोका), चंपा गंगाराम कोलेकर – अवनी (पुनश्च हरी ओम), भूमी चंद्रहास धुरी – शेतकरी महिला (पुनश्च ओम हरी), दुर्वा अतुल महाले – नूर (दर्दपोरा) यांना अभिनयासाठी प्रशस्तीपत्रके प्राप्त झाली आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक नीलेश महाले यांना (दर्दपोरा) या एकांकिकेसाठी प्राप्त झाले. दुसरे पारितोषिक सुभाष महाले यांना बुजगावणे एकांकिकेसाठी तर तिसरे पारितोषिक विमल नाईक यांना गोड गुपीत या एकांकिकेसाठी प्राप्त झाले. उत्कृष्ट नेपथ्यासाठी जयप्रकाश निर्मले (दर्दपोरा), प्रशस्तीपत्रासाठी चंद्रशील च्यारी (बुजगावणे). उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठाr अमोल प्रभूगावकर (बुजगावणे), प्रशस्तीपत्रासाठी संजय मांद्रेकर (दर्दपोरा). उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी सचिन चौगुले (दर्दपोरा), उत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रियांका नाईक (उंच माझा झोका), उत्कृष्ट वेशभूषेसाठी सुवर्णा कामत (गोड गुपीत), प्रशस्तीपत्रासाठी अमेल प्रभुगावकर (बुजगावणे) यांची निवड करण्यात आली आहे.

उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम पारितोषिक रुचा केळकर (गोड गुपीत), तर विणा प्रभुगावकर यांना (उंच माझा झोका) या एकांकिकेसाठी दुसरे पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षण फेर्मिन गॉयस, किर्तीकुमार प्रभू व प्रवीण सबनीस यांनी केले. कला अकादमीतर्फे सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. विद्यालयीन आणि उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एकत्रितपणे करण्यात येणार असून त्याची तारीख मागावून जाहीर करण्यात येईल, असे कला अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.

 

Related Stories

पाच पालिकांचे भवितव्य लटकतेच

Amit Kulkarni

माजी मंत्री महादेव नाईक यांचा आपमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

सौ.विजयाताईवर आज अंत्यसंस्कार

Patil_p

देव बोडगेश्वर जत्रोत्सवात भक्तांची अलोट गर्दी

Patil_p

मुर्तादाच्या गोलने मुंबईने अग्रस्थानावरील आघाडी वाढविला

Amit Kulkarni

साहित्यिक, इतिहास संशोधक ऍड.पांडुरंग नागवेकर यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!