तरुण भारत

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

प्रतिनिधी \ बेळगाव

मोटार सायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवलत्ती (ता. खानापूर) येथील एका रहिवाशाचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

गजबर मकबुल फरास (वय 43, रा. देवलत्ती) असे त्याचे नाव आहे. सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी देवलत्तीजवळ झालेल्या मोटार सायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता दुपारी त्याचा मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये

Amit Kulkarni

दोन खुनांचे गुढ उकलण्याचे आव्हान कायम

Patil_p

अंडर ग्राऊंड डॉक्टरांनी बाहेर पडावे

Patil_p

विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा

Amit Kulkarni

आता शिक्षकांनाही ऑनलाईन शिक्षण

Patil_p

बेळगाव जिह्यातील दारु दुकाने 5 रोजी बंद

Patil_p
error: Content is protected !!