तरुण भारत

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचा प्रश्न पडला भिजत

विशाल कदम/ सातारा

सातारा शहराला जसे ऐतिहासिक महत्व आहे. तसेच शहरातील अनेकजण भारतीय सैन्यात देश सेवा करण्याकरता कार्यरत आहेत. तर काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत. सातारा तालुक्याचे पोगरवाडी गावचे सुपूत्र हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचा आणि साताऱयाचा जवळचा संबंध होता. सातारा शहरात त्यांचे चांगले स्मारक व्हावे असा विचारही त्यावेळी पुढे आला होता. पालिकेच्या सभेत दोन वेळा त्यावर चर्चा होवून विषय अजेंडय़ावर घेवून मंजूरीही दिली गेली. पालिकेच्या अर्थसंकल्पातही दरवषीं तशी तरतूद केली जात आहे. देशसेवेसाठी ज्यांनी रक्त सांडले त्यांचीच उपेक्षात होत आहे. स्मारकासाठी माजी सैनिकांनाच द्यावा लागतोय लढा असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. 

Advertisements

सैन्य दलात आज जिह्यातील अनेकजण कार्यरत आहेत. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तसेच सातारा शहरातील अनेकजण देशसेंवेचे कार्य करत आहेत. शहराशी जवळचे नाते असलेले पोगरवाडीचे हुतात्मा संतोष घोरपडे यांचे भव्य स्मारक व्हावे याकरता पालिकेने त्यावेळी बऱयाच खटपटी केल्या म्हणे. सर्वसाधारण सभेत दोन वेळा त्यावर चर्चा झाली. सुरुवातीला हे स्मारक रयत शिक्षण संस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्यासमोर करण्याचे ठरले. परंतु ती जागा पालिकेच्या अखत्यारित येत नसल्याने तेही थांबले. पुन्हा आर्युवेदिक गार्डनमध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले. अगोदरच आर्युवेदीक गार्डनच्या कामावर तक्रारी झाल्या आहेत. त्याबाबत स्थावर जिंदगी या विभागात विचारणा केली असता आर्युवेदीक गार्डनमध्ये हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक होण्याकरता तसा कोणताही प्रस्ताव नाही. तुम्ही सांगता हेच आम्ही ऐकतो असे सांगून हात झटकले. देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या स्मारकासाठी पालिकेला गेली चार वर्ष जागाच सापडेना अशी अवस्था झाली आहे.

पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

जिह्याचे सुपूत्र कर्नल संतोष महाडिक हे हुतात्मा होवून बराच काळ लोटला आहे. ज्या दिवशी हुतात्मा झाले त्याच दिवशी नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने त्यांचे स्मारक बांधण्याचे तात्कालिन पालकमंत्र्यांनी घोषीत केले होते. पालिकेने तशी तरतूद करुन ठेवली आहे. कमिटीचे गठण केले आहे. मात्र, स्मारक होत नसल्याने आता पालकमंत्र्यांनाच 26 रोजी मी काळे झेंडे दाखवणार आहे.

शंकर माळवदे माजी उपनगराध्यक्ष

स्मारक करणारच

आमचे नेते उदयनराजे यांच्या मार्गंदर्शक सुचनेनुसार शहरात भव्यदिव्य असे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणार आहे. काही तांत्रिक बाबी आहेत त्या लवकरच दुर करुन स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू.

नगराध्यक्षा माधवी कदम

स्मारक झालं पाहिजे

हुतात्मा संतोष महाडिक यांचे स्मारक मार्गी लागले पाहिजे. पण त्या स्मारकाला आडकाठी होवू नये, प्रत्येक वर्षी 50 लाखाची तरतूद केली जात आहे. परंतु त्यातून काहीच काम होताना दिसत नाही. स्मारकासाठी जी जी कागदपत्रे आहेत. त्याची पूर्तता करणे हे प्रशासनाचे काम आहे. प्रशासनाने काम हाती घ्यावे.

Related Stories

दिवाळीसाठी कराडची बाजारपेठ सज्ज

Patil_p

विद्यार्थी हो…., पाठय़पुस्तक जपून ठेवा’

Patil_p

सातारा जिल्हा परिषदेचे कामकाज दोन दिवस बंद

Abhijeet Shinde

छत्रपती संभाजीराजे माझे भाऊच

Patil_p

साताऱयाचा ग्रंथमहोत्सव आगळावेगळा

Patil_p

साताऱयात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!