तरुण भारत

बोटीने, खांद्यावरून खांब नेत वीजपुरवठा केला सुरळीत

प्रतिनिधी / सातारा :

सातारा जिह्यातील शेवटचे टोक असलेल्या चकदेव (ता. महाबळेश्वर) या अतिदुर्गम कंदाटी खोयातील गावामध्ये 5 घरांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचायांनी तीन नवीन वीजखांब कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून बोटीने आणि त्यानंतर खांद्यावरून 1300 मीटर उंचीच्या डोंगरावर पायवाटेने नेत ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला. मंगळवारी (दि. 21) सायंकाळी चकदेवमधील या पाचही घरांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

Advertisements

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या वाई विभागातील तापोळा शाखेअंतर्गत चकदेव (ता. महाबळेश्वर) या गावातील 30 घरकुलांना वीजपुरवठा करणारा एक वीजखांब शुक्रवारी (दि. 17) कोसळला आणि त्यामुळे जवळचे दोन वीजखांब देखील वाकले होते. या भागात सुमारे 5 हजारांहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो. यासह कडाक्याच्या थंडीचा परिणाम होऊन हे वीजखांब नादुरुस्त झाले होते. महावितरणच्या कर्मचायांना त्वरीत चकदेव गावात जाऊन तात्पुरत्या व्यवस्थेतून 25 घरांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित 5 घरांसाठी नवीन तीन वीजखांब बसविणे आवश्यक होते. परंतु नवीन वीजखांबांच्या वाहतुकीसाठी नैसर्गिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्याचे आव्हान स्वीकारून महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. दत्तात्रेय जरे व सहकायांनी नादुरुस्त वीजखांब त्वरीत बदलण्यास प्राधान्य दिले. 

त्याप्रमाणे तापोळा येथून तीन नवीन वीजखांब बोटीद्वारे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून 30 किलोमीटरवरील वलवण या गावी नेण्यात आले. तेथून चकदेव गावात जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने महावितरणचे कर्मचारी किरण माने, तुषार सावंत, रामू नाईक, विजय आखाडे, समीर माने यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने खांद्यावरून तीन वीजखांबांचा प्रवास सुरु केला. दुर्तफा जंगल, कोकणकडय़ांच्या कडेने जाणारी अरुंद पायवाट आणि समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंच डोंगरावरील चकदेव गावात जाण्यासाठी तीन किलोमीटर प्रवासासाठी साडेचार तासांचा अवधी लागला. अशा खडतर स्थितीत वीजखांब संबंधीत जागेवर नेण्यात आले व ते रोवण्याचे काम सुरु झाले. 

जुने नादुरुस्त वीजखांब व वाहिन्या काढून त्याठिकाणी तीन नवीन वीजखांब व वाहिन्या उभारण्याचे काम मंगळवारी (दि. 21) सायंकाळी पूर्ण झाले व चकदेवमधील उर्वरित पाच घरकुलांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या वीजग्राहकांनी महावितरणच्या ग्राहकसेवेला धन्यवाद दिले. महावितरणकडूनही सहकार्य करणाया ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. चकदेवच्या वीजपुरवठय़ासाठी वीजखांब व इतर साहित्य तातडीने उपलब्ध करून देत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी वाई विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संजय सोनवलकर, उपकार्यकारी अभियंता श्री. प्रशांत गाडे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. दत्तात्रेय जरे व तापोळा शाखेतील कर्मचायांनी ग्राहकसेवेसाठी बजावलेल्या कामगिरीचे प्रभारी पुणे प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे, सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. उदय कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.

Related Stories

जागा अडवणाऱ्यांना घरी बसवा : आ. शिवेंद्रराजे

datta jadhav

सातारा जिल्ह्यातील सलून्स,पार्लर सशर्त सुरु

Abhijeet Shinde

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर वाटून आनंदोत्सव

datta jadhav

जिल्हा वाहतूक शाखेच्या जवानांचा प्रामाणिकपणा

Patil_p

वाई शहरात कडक टाळेबंदी

Patil_p

सातारा : भाजपकडून ‘शेतकरी विरोधी पत्रक’ फाडून ठाकरे सरकारचा निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!