तरुण भारत

चीनमधील भारतीय प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम रद्द

 ऑनलाईन टीम / बीजिंग :

चीनमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादूर्भाव वाढल्याने यंदाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Advertisements

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 25 लोकांचा बळी गेला आहे. तर 830 लोकांना याची लागण झाली आहे. चीनमधील 20 प्रांतीय भागांमध्ये एकूण 1072 संशयित आढळले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय बीजिंगमधील भारतीय दूतावासाने घेतला आहे.

वुहान आणि आसपासच्या परिसरात 700 भारतीय विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. चीनमध्ये राहणाऱया सर्व भारतीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे चीनी अधिकाऱयाने सांगितल्याचे भारतीय दूतावासाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Related Stories

पॅरालिम्पिकमध्ये भारत 24 व्या स्थानावर

datta jadhav

हिजबुल प्रमुख सलाहुदीन दहशतवादी घोषित

Patil_p

अरविंद केजरीवाल दहशतवादी : प्रवेश वर्मा

prashant_c

मंत्रीही खरेदी करतात असे स्टेशनरी दुकान

Patil_p

येमेनमध्ये हूती बंडखोर बॅकफूटवर

Patil_p

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारताच्या वाटेवर ?

Patil_p
error: Content is protected !!