तरुण भारत

शिवाजीनगर येथील तरुण बेपत्ता

मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी \ बेळगाव

Advertisements

पंजीबाबा-शिवाजीनगर येथील एक तरुण गेल्या 20 दिवसापासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या कुटुंबीयांनी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नियोज अब्दुलरेहमान कंदगल (वय 24) असे त्याचे नाव आहे. 3 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता बेनन्स स्मिथ कॉलेजला जाऊन येण्याचे सांगून तो आपल्या घरातून बाहेर पडला होता. तो अद्याप घरी परतलला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी चार दिवसांपूर्वी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.

6.3 फूट उंची, गोल चेहरा, अंगाने सडपातळ, असे त्याचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना त्याने आपल्या अंगावर लाल रंगाचा फूल शर्ट व काळी पँट परिधान केला होता. या तरुणाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.

Related Stories

बेळगावसह 15 जिल्हय़ांमध्ये नव्या कूपनलिका खोदण्यास बंदी

Omkar B

बेळगाव- बेंगळूर रेल्वेला केवळ 29 टक्केच प्रवासी

Patil_p

हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीचे आवाहन

Amit Kulkarni

‘सदाफुली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

कल्याण पत्नीने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

Patil_p

कोरोनाच्या कठोर नियमात उद्या मतमोजणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!