तरुण भारत

लखनौ विद्यापीठात नागरिकत्व कायदा शिकविणार

लखनौ

 केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन सुरू केलेले असतानाच उत्तर प्रदेश सरकारने मात्र हा कायदा लखनौ विद्यापीठात शिकविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यशास्त्र या विषयात या कायद्याचा समावेश केला जाणार आहे.राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना आणि नागरिकत्व हे विषय पूर्वीपासून शिकविले जातात. आता सरकारने नागरिकत्वाविषयी केलेल्या नव्या कायद्याचा समावेशही अभ्यासक्रमात होणार आहे. या कायद्याबद्दल अनेक गैरसमज हेतुपुरस्सर पसरविले जात आहेत. या कायद्यामुळे विशिष्ट धर्माच्या भारतीय नागरिकांना नागरिकत्व गमवावे लागेल, अशा अफवा उठविण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने जनतेचे प्रबोधन करून या अफवा आणि गैरसमज हाणून पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना या कायद्याचे धडे देण्यात येणार आहेत, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयीचे प्रश्न सर्वसामान्य लोकांकडून कायद्याच्या विद्यार्थ्यांना विचारले जात आहेत. अनेक नागरिकांना या कायद्याची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे सरकारने लोकांना हा कायदा समजून देण्यासाठी उपाय योजिले आहेत.  

Advertisements

Related Stories

केरळच्या कोची शहरातील अवैध इमारती जमीनदोस्त

Patil_p

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

कोरोनाचा कहर : दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांनी गमावला जीव; सर्वात जास्त मृत्यू बिहारमध्ये

Rohan_P

अर्निया सेक्टरमध्ये दिसली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा धाव घेऊ!

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

Patil_p
error: Content is protected !!