तरुण भारत

‘लाचलुचपत’कडून वर्षभरात 13 लोकसेवकांवर कारवाई

जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रकरण ठरले चर्चेचा विषय

प्रवीण जाधव / रत्नागिरी

Advertisements

शासकीय कामांमध्ये वाढलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात येत़े  रत्नागिरी जिह्यात मागील वर्षी 8 प्रकरणांमध्ये 13 जणांविरूद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल़ी यामध्ये सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक प्रल्हाद देवकर यांना लाच स्वीकारताना करण्यात आलेली अटक व याच प्रकरणात तक्रारदाराने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, यामुळे जिल्हाभरात हा विषय चर्चेचा ठरला होत़ा

गतवर्षी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत राजापूर तालुक्यातील भालावलीमधील तलाठी लक्ष्मण हिरामठ पारडे, जिल्हा शासकीय रूग्णालयातील शल्य चिकित्सक प्रल्हाद देवकर, कर्मचारी अजित नरोटे, अनंत कदम, गुहागर एज्युकेशन सोयायटीमधील लिपिक उदय रावणांग, राजेश खामकर, गुहागरातील येथील निवृत्त नायब तहसीलदार उल्हास नारायण कदम, संगमेश्वर येथील अजय तांबे, शिवभर पंडित, राजापूर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून अस्मिता वैभव चोरगे, रत्नागिरी तालुक्यातील चवे येथील ग्रामसेवक विनायक जाधव, दापोलीतील मंडल अधिकारी प्रितम कानसरे व केळशी येथील तलाठी प्रभाकर सोनावणे यांचा समावेश आह़े

 राजापूर तालुक्यातील भालावली येथील तलाठी लक्ष्मण पारडे यांच्यावर 25 जानेवारी 2019 रोजी कारवाई करण्यात आली होत़ी  सातबारावर नावनोंदणी करण्यासाठी 3 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आह़े राजापूर तहसीलदार कार्यालय आवारातच लाचलुचपतच्या विभागाकडून पारडे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होत़े तर 4 फेबुवारी रोजी रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक प्रल्हाद नारायण देवकर यांना मेडिकल बिल मंजूर करण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले होत़े  या प्रकरणात रूग्णालयातील कर्मचारी अजित नरोटे व अनंत शिवराव कदम हे देखील सहभागी असल्याचे लाचलुचपतच्या चौकशीत समोर आले होत़े  त्यांच्यावरही लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा

  तत्कालीन शल्य चिकित्सक यांच्यावर लाच मागत असल्याची तक्रार करणाऱयाने उंदीर मारण्याचे विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होत़ा  तक्रारदारावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला होत़ा मात्र वैयक्तिक कारणातून त्याने हे कृत्ये केल्याचे तपासामध्ये उघड झाल़े  21 फेबुवारी 2019 रोजी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे लिपिक उदय वसंत रावणांग व राजेश खामकर यांच्यावर पेन्शनच्या कामासाठी लाच स्वीकारल्याची कारवाई करण्यात आली होत़ी

तसेच संगमेश्वर तालुक्यातील अजय तांबे व शिवभर पंडित यांच्यावर 16 जुलै रोजी कारवाई करण्यात आली होत़ी  तर गुहागर येथे निवृत्त नायाब तहसीलदार उल्हास नारायण कदम यांच्यावर भूसंपादनाचा मोबदला मिळवून देतो, असे सांगून 21 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आल़ी  कदम हे तहसीलदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते महसूल विभागाच्या भूसंपादन विभागात सेवक म्हणून कार्यरत होत़े यावेळी गुहागरातील एच एनर्जी कंपनीसाठी भूसंपादन मोबदला मिळवून देण्यासाठी 21 हजाराच्या लाचेची मागणी केली होत़ी

25 नोव्हेंबर रोजी राजापूर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून अस्मिता वैभव चोरगे यांच्यावर कारवाई करण्यात आली होत़ी  यात शेतकऱयाचा सातबारा स्वतंत्र करण्यासाठी 8 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होत़ी  तर वर्षअखेरीस रत्नागिरी तालुक्यातील चवेमधील ग्रामसेवक विनायक जाधव यांना 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल़ी तर 31 डिसेंबर रोजी दापोली येथील मंडल अधिकारी प्रितम कासारे व केळशी येथील तलाठी प्रभाकर सोनावणे यांच्यावर सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 ‘लाचलुचपत’चे न्यायालयातील अनेक खटले प्रलंबित

लाचलुचपत विभागाकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेले अनेक खटले प्रलंबित आहेत़ लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या एकही खटल्याचा निकाल गतवर्षी न्यायालयाकडून देण्यात आला नाह़ी त्यामुळे 2019मध्ये लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली कोणालाही शिक्षा व निर्दोष मुक्तता होवू शकली नाही, अशी माहिती लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक नितीन विजयकर यांनी दिल़ी 

 

 

Related Stories

रत्नागिरी : लांजाचे माजी गटविकास अधिकारी संतोष कठाळेंना अटक

Abhijeet Shinde

मोहल्ला सील करण्यावरून दाभोळमध्ये महिला आक्रमक

Patil_p

धक्कादायक : रत्नागिरी डेपोतील चालकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

जिह्यातील पूल आजही धोकादायक..!

Patil_p

अमेरिकेच्या कोरोना व्हॅक्सिनसाठी रत्नागिरीतून जातोय कच्चा माल !

Patil_p

पॉझिटीव्ह नवरदेव चढले बोहल्यावर!

Amit Kulkarni
error: Content is protected !!