तरुण भारत

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. यंदा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वाडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला. वाडकर म्हणाले, पद्मश्री मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. मला गृहमंत्रालयाकडून फोन आला व मला फोनवर पुरस्कार मिळाल्याची माहिती देण्यात आली.

आशाताई, लतादीदी यांनी मला माझ्या करिअरमध्ये खूप मदत केली. मला हा पुरस्कार लतादीदी, आशाताई यांच्या आर्शिवादामुळेच मिळाला आहे, असं ही ते म्हणाले.

दरम्यान, सुरेश वाडकर यांनी हिंदी आणि मराठी शेकडो गाणी गायली आहेत. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है यासारखी अनेक गाणी गाजलेली आहेत.

 

Related Stories

मुलांसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ला अद्याप मंजुरी नाही

Patil_p

धोका वाढला : उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार पार

Rohan_P

44 शिक्षकांचा राष्ट्रपतींकडून गौरव

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 366 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसऱया स्थानी

Patil_p

म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही : डॉ. गुलेरिया

Abhijeet Shinde
error: Content is protected !!