तरुण भारत

पोलीस दलातील ‘तो’ आणि ‘ती’ निलंबित

राजेंद्र होळकर / कोल्हापूर

जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक आणि महिला कॉन्स्टेबलमधील गैरकृत्याचे प्रकरण गेल्या आठवडय़ात चर्चेला आले होते. त्या प्रकरणाची चौकशी करुन चौकशी अंती ‘त्या दोघांना’ ही खाकी वर्दी कलंकित केल्याप्रकरणी दोषी धरुन नोकरीतून तडाकाफडकी निलंबित करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकाराशी बोलताना दिली.

Advertisements

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, फुलेवाडी रिंग रोडवरील एका नगरातील बंगल्यात संबंधीत पोलीस नाईक आणि महिला कॉन्स्टेबलला रविवारी (दि.19) दुपारी अश्लिल चाळे करीत असताना पोलीस नाईक यांच्या पत्नीला मिळून आले होते. याप्रकरणी त्या पोलीस नाईकाच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभीर्यान दखल घेवून चौकशी केली. चौकशीमध्ये तो पोलीस नाईक आणि संबंधीत महिला कॉन्स्टेबल दोषी आढळल्याने दोघांना ही नोकरीतून तडाकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.

Related Stories

बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून अल्पवयीन तरुणीचा मृत्यू

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे सर्व ट्विट डीलिट

Abhijeet Shinde

शाहुवाडीतील आठ हजार जणांचा होमक्वारंटाईन कालावधी संपला

Abhijeet Shinde

शिरढोण स्मशानभूमीच्या दुरुस्ती कामाची चौकशी करा, अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

पुलांचे भरावक्षेत्र कमी करून कमानी बांधकाम करा

Abhijeet Shinde

गोकुळ निवडणूक : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!