तरुण भारत

तुर्कस्थानातील भूकंपात 20 ठार

पूर्वतुर्कस्थानात सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था/ एलाझिग

Advertisements

पूर्वतुर्कस्थानला शनिवारी पहाटे भूकंपाचा तीव्र धक्का बसला असून त्यात किमान 20 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. आणखी 30 जण बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्मयता आहे. असंख्य इमारतींची पडझड झाली असून हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.

तुर्कस्थान हा देश दोन भूस्तरांच्या सीमेवर वसलेला असल्याने तेथे भूकंपाचा धोका नेहमी उद्भवतो. वर्षभरात तेथे सरासरी दहा लहान-मोठे भूकंप घडतात. मात्र, हा भूकंप अधिकच तीव्र होता. रिश्टर स्केलवर त्याची क्षमता 6.5 इतकी दर्शविण्यात आली होती.

त्वरित बचावकार्य सुरू

तुर्कस्थानच्या आपदा निवारण विभागाने भूकंपग्रस्त लोकांच्या साहाय्याचे काम त्वरित सुरू केले असून भूकंप झाल्यापासून आठ तासांच्या आत 50 हजारहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. इमारती पडल्यामुळे बेघर झालेल्यांसाठी निवारा छावण्या स्थापन केल्या जात आहेत.

या भूकंपाचे पडसाद शेजारच्या इराक आणि सिरिया या देशांमध्येही तीव्रपणे उमटले. मात्र, तेथे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मालमत्तेचे नुकसान मात्र मोठय़ा प्रमाणावर झाल्याची माहिती आहे. सिव्हरिस हे चार हजार लोकांच्या वस्तीचे ठिकाण पूर्णपणे नष्ट झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, लोक वेळीच घराबाहेर पडल्याने मोठय़ा प्रमाणावर जिवीतहानी होणे टळले आहे.

Related Stories

काश्मीर कन्येची बायडेन यांच्या ‘डिजिटल स्ट्रॅटेजी टीम’मध्ये निवड

datta jadhav

सद्यस्थितीत मास्कच बचावाचा सर्वोत्तम उपाय

Patil_p

जपानमध्ये 6 महिन्यांत अस्वलांकडून 13 हजार हल्ले

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

Patil_p

सांता क्लॉजमुळे 157 जणांना संक्रमण, 5 जणांचा मृत्यू

Patil_p

‘आत्मनिर्भर भारत’वर रघुराम राजन असंतुष्ट

Patil_p
error: Content is protected !!