तरुण भारत

ओमनी कारची अज्ञात वाहनाला धडक

प्रतिनिधी/ निपाणी

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाटय़ानजीक ओमनी कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसल्याने या अपघातात कोल्हापूरच्या वृद्धेसह दोघेजण ठार झाले. तर कारमधील अन्य सहाजण जखमी झाले. सुरज सुभाष सुलताने (वय 33) व श्रेया विजयकुमार लागू (वय 60, दोघेही रा. जरगनगर कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आप्पाचीवाडी फाटय़ानजीक शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. सहा जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

Advertisements

या अपघातात मीना सुभाष सुलताने (वय 59), सुमेधा विजयकुमार लागू (वय 36), अमृता नितीन साळवी (वय 35), अंनिश नितीन साळवी (वय 13), आर्या केदार कुलकर्णी (वय 10 सर्व रा. जरगनगर), पौर्णिमा सतीश पंडित (वय 47 रा. जयसिंगपूर) अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून समजलेली माहिती अशी की, ओमनी कार (क्र. एमएच 09 बीबी 2339) ही घेऊन सूरज सुलताने हे स्तवनिधी येथे श्री क्षेत्रपाल दर्शनासाठी गेले होते. परत कोल्हापूरला जाताना आप्पाचीवाडी फाटय़ानजीक आले असता अज्ञात वाहनाला धडकल्याने सर्वजण जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला नेत असता वाटेतच सूरज सुलताने व श्रेया लागू यांचा मृत्यू झाला. तर इतर सहा जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करून नंतर त्यांना खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पायोलाईन कंपनीचे अधिकारी तसेच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. तोलगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. शुक्रवारी रात्री सीपीआर रुग्णालयात मित्र परिवार व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.  

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट

शनिवारी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, सीपीआय संतोष सत्यनायक, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह भेट दिली. यावेळी रेड्डी यांनी अपघाताची माहिती जाणून घेतली.

Related Stories

चचडीनजीक परिवहन बसची कारला धडक बसून अपघात

Rohan_P

‘तो’ कलंडलेला वीजखाब केला सरळ

Amit Kulkarni

बॅकांमध्येच जनधन खाते काढा

Patil_p

तामिळनाडूचा कार्तिकेश्वर रवीकुमार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

Amit Kulkarni

रविवारपेठेसह बाजारपेठेतील बॅरिकेड्स हटवा

Patil_p

ग्राम पंचायत निवडणुकीतून सीमाप्रश्नाला बळकटी द्या

Patil_p
error: Content is protected !!