तरुण भारत

एप्रिलमध्ये सुरू होणार संघाची सैन्यशाळा

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सैन्यशाळेचे पहिले सत्र एप्रिलपासून सुरू होणार आहे. या शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. शाळेतील शिक्षणात संस्कार, संस्कृती आणि समरसपणाचा भाव राहणार असल्याचे संघाच्या पदाधिकाऱयाने म्हटले आहे.

Advertisements

संघाची ही शाळा उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरात सुरू केली जाणार आहे. या शाळेला माजी सरसंघचालक राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैया यांचे नाव देण्यात ओल आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासह नैतिक आणि अध्यात्मिक दिशा देण्याचा प्रयत्न असून असल्याचे संघाच्या पदाधिकाऱयाने म्हटले आहे.

शाळेसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी होणार असून 1 मार्च रोजी प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजीतील विद्यार्थ्यांचे प्राविण्य पडताळून पाहिले जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर मुलाखत तसेच वैद्यकीय चाचणी होणार असल्याची माहिती शाळेचे संचालक कर्नल शिवप्रताप सिंग यांनी दिली आहे. 

संघाची सैन्यशाळा..

– शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकविला जाणार असून 6 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण दिले जाईल.

– पहिले सत्र एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून यात 160 विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

– या शाळेत केवळ मुलांनाच शिक्षण दिले जाणार आहे. पुढील काळात मुलींकरता दुसरी शाखा सुरू केली जाऊ शकते.

– सैन्यशाळा बुलंदशहराच्या शिकारपूरमध्ये सुरू होणार आहे. तेथेच रज्जू भैया यांचा जन्म झाला होता.

-शाळेचे संचालन विद्याभारती करणार आहे. या संस्थेकडून देशभरात 20 हजारांहून अधिक शाळा चालविल्या जातात.

-संघाच्या सैन्यशाळेसाठी माजी सैनिक चौधरी राजपाल सिंग यांनी 8 एकर जमीन दान केली आहे.

-शाळेत हुतात्मा सैनिकांच्या मुलांसाठी 8 जागा राखीव राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

Related Stories

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 1,329 नवे रुग्ण

Rohan_P

दिल्ली : कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 748 वर

Rohan_P

देशाने नोंदवलाय अनपेक्षित रेकॉर्ड

datta jadhav

खराब हवामानामुळे प्रतिदिन ८ जणांचा मृत्यू

Patil_p

गरीब राज्यांच्या यादीवरून राजकारण

Patil_p

”भाजप कार्यालयात महिलेवर अत्याचार, आवाज दाबण्यासाठी पीडितेवर मारहाणीचा आरोप”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!